पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बांगलादेशचा संघ येईल! गांगुली यांनी दिला PM शेख हसीना यांचा दाखला

सौरव गांगुली

नव नियुक्ती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बांगलादेशचा भारत दौरा सुनिश्चित असल्याचे स्पष्ट केले. बांगलादेशच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंमध्ये वेतन वाढीच्या मुद्यावरुन तणावाचे वातावरण आहे. खेळाडू कोणत्याही क्रिकेट दौऱ्यापासून दूर राहण्याच्या तयारीत असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.  

बांगलादेशच्या खेळाडूंच्या या निर्णयामुळे त्यांचा नियोजित भारत दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असताना बांगलादेशचा भारत दौरा नियोजित वेळेनुसारच होईल, असे गांगुली यांनी म्हटले आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा दाखला देत त्यांनी दौरा सुनिश्चित असल्याचे सांगितले.  

ICC क्रमवारीतही रोहित शर्माने केला पराक्रम

वेतन वाढीच्या मुद्यावरुन बांगलादेश क्रिकेटमध्ये जे काही सुरु आहे तो त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी कोलकाता येथील कसोटी सामन्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे. देशाच्या पंतप्रधानांनी दौऱ्यातील सामन्याला येण्याची तयारी दर्शवली असताना बांगलादेशचा संघ दौऱ्यातून माघार घेईल असे वाटत नाही, असे गांगुली यांनी म्हटले आहे.    

ballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर

३ नोव्हेंबरपासून बांगलादेशच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात बांगलादेश तीन टी-२० सामन्यासह दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताविरुद्धच ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या लढतीला सुरुवात करतील.   

भारत-बांगलादेश वेळापत्रक 
३ नोव्हेंबर - पहिला टी-२० सामना- दिल्ली
७ नोव्हेंबर - दुसरा टी-२० सामना- राजकोट
१० नोव्हेंबर - तीसरा टी-२० सामना- नागपूर
१४-१८ नोव्हेंबर- कसोटी सामना - इंदौर
२२-२६ नोव्हेंबर - दुसरा कसोटी सामना- कोलकाता
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: bangladesh pm sheikh hasina accept invitation for india vs bangladesh test in kolkata says sourrav ganguly