पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'धक्काधक्की'त बांगलादेशचा संघ दिल्लीत दाखल

बांगलादेशचा संघ दिल्लीत दाखल

India vs Bangladesh: बांगलादेशचा संघ आगामी टी-२० आणि कसोटी मालिकेसाठी बुधवारी दिल्लीमध्ये  दाखल झाला. भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. ३ नोव्हेंबरला दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवरुन बांगलादेश आणि भारत यांच्यातील मालिकेला सुरुवात होईल.

रोहितच्या नेतृत्वाखाली यांना मिळेल कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी

या दौऱ्याचे वैशिष्ट्ये म्हणेज टी-२० दौऱ्यानंतर होणाऱ्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना हा पिंक चेंडूवर खेळण्यात येणार आहे. भारतासाठी हा पहिला डे नाइट कसोटी सामना असेल. दौऱ्याच्या सुरुवातीलाच बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार आणि अष्टपैलून शाकिब अल हसन याच्यावर आयसीसीने निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे बांगलादेशला हा दौरा आणखी कठिण होऊन बसला आहे. यापूर्वी तमिम इक्बाल मालिकेला मुकणार असल्याचे स्पष्ट झाले होते. या 'धक्काधक्की'नंतर संघ भारत दौऱ्यावर कशी कामगिरी करणार पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

वॉर्नर-स्मिथ जोडीसमोर लंकेचा खेळ खल्लास!

शाकिबच्या अनुपस्थितीत बांगलादेशच्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी ही महमुदुल्ल्हाच्या खांद्यावर देण्यात आली आहे. टी-२० मालिकेमध्ये तो संघाचे नेतृत्व करताना दिसेल. तर कसोटी मालिकेसाठी मोमिनुल हक संघाचू धूरा सांभाळेल. भारतीय संघा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. विराटच्या नेतृत्वाखाली विंडीजमध्ये भारताने दमदार कामगिरी नोंदवली. त्यानंर पाहुण्या दक्षिण आफ्रिकेचीही दाणादाण उडवली. टी-२० मध्ये रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आपला विजयी धडाका कायम ठेवण्यास उत्सुक असेल.