पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लेग स्पिनरला न खेळवल्याने २ प्रशिक्षकांचे निलंबन

बांगलादेशचा संघ सध्या लेग स्पिनरच्या शोधात आहे.

क्रिकेटचा खेळ दिवसेंदिवस फलंदाजांच्या बाजूने झुकतानाचे चित्र दिसत आहे. या परिस्थितीत खास शैलीच्या गोलंदाजांना संघात स्थान न दिल्याने प्रशिक्षकांना घरचा रस्ता दाखवण्याचा प्रकार समोर आला आहे. बांगलादेशच्या राष्ट्रीय क्रिकेट लीगमध्ये प्रशिक्षकांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये लेग स्पिनरला स्थान दिले नाही म्हणून दोन प्रशिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. 

सरफराजला दणका, कर्णधारपदासह संघातील स्थानही गमावले

बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ लेग स्पिनरच्या शोधात आहे. याशिवाय बांगलादेशचे फलंदाज लेग स्पिनरचा सामना करताना बॅकफूटवर खेळताना पाहायला मिळाले. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात लेग स्पिनर राशिद खानला खेळतान बांगलादेशच्या फलंदाजांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळाले. याच सर्वाचा विचार करुन बांगलादेश क्रिकेट मंडळाने स्थानिक क्रिकेटमध्ये लेग स्पिनरला संधी देण्याचे आदेश दिले होते. मात्र देशांतर्गत लीगमध्ये मंडळाचा आदेशाचे पालन न करता संघ निवड करण्यात आली. त्यामुळे बांगलादेश क्रिकेट मंडळाने दोन प्रशिक्षकांना निलंबित करण्याचा मोठा निर्णय घेतला. 

INDvsSA : फाटक्या नशीबाच्या कर्णधाराला टॉसची चिंता

बांगलादेशमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक लीग स्पर्धेत ढाकाच्या संघातील लेग स्पिनर झुबैर हुसेन आणि खुलनाच्या संघातील रिशाद हुसैन यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. याप्रकरणात बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नजमुल हुसेन म्हणाले की, लेग स्पिनरला संधी द्यावी यासंदर्भात स्थानिक संघाना आदेश दिले होते. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे दोन प्रशिक्षकांवर कारवाई करण्यात आली.