पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनवर दोन वर्षांची बंदी

शाकिब अल हसन

बांगलादेश क्रिकेट टीमचा कर्णधार शाकिब अल हसनवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. शाकिबने आयसीसीसमोर आपली चूक मान्य केली आहे. 'ज्या खेळावर माझे प्रेम आहे, त्यातून निलंबित केल्यामुळे मी खूप दुःखी आहे आहे. पण मला ही शिक्षा मान्य आहे. सट्टेबाजाच्या प्रस्तावाची माहिती न देऊन मी आपली जबाबदारी निभावलेली नाही.', असे टि्वट त्याने केले आहे. तो पुढील वर्षी आयपीएल आणि ऑस्ट्रेलियात १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या टी २० विश्वचषकात खेळू शकणार नाही.

कसोटीत सर्वाधिक शतकं झळकवणारे 'चार' सलामीवीर

बीसीबीने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाकिबला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. शाकिबने खेळाडूंच्या संपाचे नेतृत्व केले होते. त्याचबरोबर शाकिबवर बुकींनी त्याच्याशी संपर्क साधल्याची माहिती लपवल्याचाही आरोप आहे. शाकिब नुकताच ग्रामीण फोन कंपनीशी अँबेसेडर म्हणून जोडला गेला होता. बीसीबीचे खेळाडू राष्ट्रीय करारानुसार टेलिकॉम कंपनीशी जोडले जावू शकत नाहीत.

बांगलादेशचा कसोटी आणि टी २० चा कर्णधार शाकिबला आयसीसीने २ वर्षांसाठी बंदी घातली आहे. त्यामुळे भारत दौऱ्यापूर्वी बीसीबीसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. या दौऱ्यात तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांशिवाय दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत.

यापूर्वी आयसीसीच्या सांगण्यावरुन बीसीबीने शाकिबला सरावापासून दूर ठेवले होते. त्यामुळे तो सरावात सहभागी होऊ शकला नाही, आणि गुलाबी चेंडूवर कसोटी सामना खेळण्याविषयीच्या आयोजित बैठकीत भाग घेऊ शकला नाही.

IPL 2020 : या पाच गोलंदाजांवर असतील बंगळूरुच्या नजरा

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी शाकिबला एका आंतरराष्ट्रीय सामन्यापूर्वी सट्टेबाजांनी ऑफर दिली होती. पण त्याने याची माहिती आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाला दिली नाही. आता शाकिबने आपली चूक मान्य केली आहे.

बांगलादेश क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक आणि जागतिक क्रिकेटमध्ये क्रमांक एकचा अष्टपैलू असलेल्या शाकिबच्या नावावर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ११००० अधिक धावा आणि ५०० हून अधिक विकेट त्याच्या नावावर आहे. शाकिबच्या अनुपस्थितीत मुशफिकुर रहीम कसोटी सामन्यात तर महमुदुल्लाह टी २० मध्ये संघाचे प्रतिनिधीत्व करु शकतात.

बांगलादेश आपल्या दौऱ्याची सुरुवात ३ नोव्हेंबरपासून होणाऱ्या तीन टी २० सामन्यांच्या मालिकेतून करेल. त्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत १४ नोव्हेंबरपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका होईल. पहिली कसोटी इंदूरमध्ये तर दुसरी कसोटी २२ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे खेळली जाईल.