पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर

नेयमार

फुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा 'बॅलन डी ऑर'च्या शर्यतीतून ब्राझीलचा स्टार नेयमार बाहेर पडला आहे. पुरुष गटात अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी, पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि डेन्मार्कचा वर्जिन वान डिक हे तिघे आघाडीवर असून महिला गटात अमेरिकेची सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू मेगन रैपीनोए आघाडीवर आहे. 

BCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...

फ्रान्सने चार गटातील खेळाडूंची यादी जाही केली आहे. क्रोएशियाला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यंत घेऊन जाण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या लूका मोडरिच आणि ब्राझीलचा नेयमारला या यादीत स्थान मिळालेले नाही.  दुखापत आणि निलंबनाच्या वादात अडकल्यामुळे नेयमारला या यादीत स्थान मिळालेले नाही. दुसरीकडे फिफाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार मिळालेल्या मेस्सी आणि रोनाल्डोला या यादीत स्थान देण्यात आले आहे.  

 'बॅलन डी ऑर' पुरस्काराच्या शर्यतीत मेस्सीला रोनाल्डो आणि वर्जिल वॉन डिकचे आव्हान असणार आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावण्यामध्ये मागील दहा वर्षांपासून रोनाल्डो-मेस्सी यांचे अधिराज्य राहिले आहे. मात्र मागील वर्षी  लुका मोड्रिचने त्यांचा विक्रम मोडीत काढत हा पुरस्कार पटकावला होता.  

दादू मामा : तांबड्या मातीतील रांगडा पैलवान

महिला विश्वचषक स्पर्धेत अमेरिकला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या  रैपीनोए पुरस्काराच्या शर्यतीत अव्वलस्थानी आहे. तिच्याशिवाय अमेरिकेच्या फुटबॉल संघातील  टोबिन हीथ आणि एलेक्स मोर्गन यांचा देखील या यादीत समावेश आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ballon d or 2019 shortlisted 30 players including messi ronaldo van dijk modric and neymar out