पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जागतिक कुस्ती स्पर्धाः बजरंग, रवीची कांस्य पदकावर मोहोर

बजरंग पुनिया

भारतीय स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि रवी कुमार दहियाने आपापले सामने जिंकून शुक्रवारी जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. बजरंगने पुरुषांच्या ६५ किग्रॅ फ्री स्टाइलमध्ये कांस्य पदक जिंकून जागतिक कुस्ती स्पर्धेत आपले एकूण तिसरे पदक पटकावले. 

बजरंगने कांस्य पदकाच्या सामन्यात मंगोलियाच्या तुल्गा तुमूर ओचिरचा ८-७ ने पराभव केला. बजरंगने यापूर्वी २०१३ मध्ये कांस्य आणि २०१८ मध्ये रौप्य पदक पटकावले होते.

तर रवी कुमारने इराणच्या रेजा अत्री नागाहरचीला ५७ किग्रॅ फ्री स्टाइल गटात पराभूत केले. जागतिक स्पर्धेतील त्याचे हे पहिलेच पदक आहे. 

केंद्रीय मंत्री किरण रिजिजूनी बजरंगला जागतिक स्पर्धेतील पदकाबद्दल अभिनंदन केले आहे.