पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इन्स्टाग्राम पोस्ट नडली! स्मिथवर निलंबनाची कारवाई

एमिली स्मिथ

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए)ने बिग बॅश लीगमध्ये खेळणाऱ्या महिला क्रिकेटर एमिली स्मिथ हिच्यावर एका वर्षांची बंदी घातली आहे. एमिलीने सामन्याच्या एक तासापूर्वी आपली प्लेइंग इलेव्हनची यादी इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केली होती. ऑस्ट्रेलिया क्रिकेटने तिचे हे कृत्य आचारसंहितेचे उल्लंघन मानून तिच्यावर निलंबनाची कारवाई केली.  

संघाकडून सर्वोच्च धावसंख्या १० असूनही भारतीय महिलांनी मारली बाजी

अँटी करप्शन कोडच्या कलम २.३.२ च्या उल्लंघन केल्याप्रकरणी झालेली शिक्षा एमिली स्मिथने मान्य केली आहे. एक वर्षांच्या बंदीमध्ये ९ महिन्यांची शिक्षा माफ केल्यामुळे तिला तीन महिने क्रिकेटच्या मैदानातून दूर रहावे लागणार आहे.   
बिग बॅशमध्ये होबार्ट हरीकेनकडून खेळणाऱ्या यष्टिरक्षक स्मिथने २ नोव्हेंबरला खेळाडू आणि संघातील अधिकृत सदस्यांसाठी चित्रित करण्यात आलेला व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला होता.

IPL 2020: ..तर स्टेन'गन' मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिसेल

सिडनी थंडर विरुद्ध होणाऱ्या सामन्याला १ तास बाकी असताना तिने हा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये प्लेइंग इलेव्हनची माहिती होती. विशेष म्हणजे पावसाच्या व्यत्ययामुळे नाणेफेकीशिवायच सामना रद्द झाला होता. मात्र महिला क्रिकेटरला निलंबनाच्या कारवाईस सामोरे जावे लागले.