पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून खेळापेक्षा तिच्या नेलपेंटची झाली चर्चा!

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत स्टार महिला खेळाडूच्या नेलपेंटची चर्चा

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील सुरुवातीच्या दोन लढती अपेक्षेप्रमाणे एकहाती जिंकत महिला गटातून सेरेना विजयाच्या दिशेने आगेकूच सुरु आहे. वर्षातील पहिली ग्लँडस्लॅम स्पर्धा जिंकून २४ वेळा हा पराक्रम करण्याच्या इराद्याने सेरेना कोर्टवर उतरली आहे. सध्याच्या घडीला तिच्या कोर्टवरील खेळापेक्षा तिच्या नेलपेंटची जोरदार चर्चा सुरु आहे.  

NZvsIND:उसळत्या खेळपट्टीवर यष्टिमागे कोण दिसेल? पंत, राहुल की सॅमसन...

गँडस्लॅम स्पर्धेत खास अंदाजात कोर्टवर उतरुन सेरेना अनेकदा चर्चेत आली आहे. यापूर्वी  सेरेनाच्या 'ब्लॅक कॅट सूट'ची जोरदार चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले होते. ड्रेसमुळे तिच्यावर टीकाही झाली होती. ऑस्ट्रेलियन ओपनमधील सलामीच्या लढतीत सेरेना खास नेलपेंट लावून कोर्टवर उतरल्याचे पाहायला मिळाले. तिने हाताच्या प्रत्येक बोटावर वेगवेगळ्या रंगांची नेलपेंट लावल्याचे पाहायला मिळाले. एका बोटाच्या नखावर तिने कोअला प्राण्यांची प्रतिमा रंगवल्याचे पाहिला मिळाले. तिच्या या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.  सेरेनाच्या नेलपेंटची चर्चा

किवींचा बदला घेण्यासंदर्भात विराटनं व्यक्त केल्या मनातल्या भावना

ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भयंकर आगीत कोट्यवधी जनावरांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेत २५ हजारहून अधिक ऑस्ट्रेलियन कोआला या प्राण्यांचा मृत्यू झाला. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेपूर्वी पीडित लोकांच्या मदतीसाठी आयोजित केलेल्या टेनिसच्या सामन्यांमध्येही सेरेनाने सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले होते. तिच्याशिवाय राफेल नडाल, नोव्हाक जोकोविच यासारख्या दिग्गज खेळाडूंनी देखील सहभागी झाले होते.  

सेरेना विल्यम्स

australian open सानियानं अर्ध्या सामन्यानंतर सोडली नादियाची साथ

ऑस्ट्रेलियातील आगीच्या घटनेमुळे परिसरात निर्माण झालेल्या हवेतील प्रदुषणाबाबत स्पर्धेपूर्वी सेरेनाने चिंता व्यक्त केली होती. मला यापूर्वी श्वाससंदर्भातील आजाराचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियातील परिस्थितीचा खेळावर परिणाम होऊ शकतो, असे सेरेनाने म्हटले होते. मात्र पहिल्या दोन सामन्यात तिने दमदार खेळ केल्याचे पाहायला मिळाले आहे.