पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऑस्ट्रेलिया ओपन बॅडमिंटन : सिंधू अन् समीरचे आव्हान संपुष्टात 

पी. व्ही. सिंधू

ऑलिम्पिक आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धा गाजवणारी पीव्ही सिंधूचा ऑस्ट्रेलिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील प्रवास दुसऱ्या फेरीतच थांबला. महिला एकेरीतील लढतीत जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पाचव्या स्थानावर असणाऱ्या सिंधूला थायलँडच्या  निचाओन जिंदापोल हिने २१-१९, २१-१८ असे सरळसेटमध्ये पराभूत केले. जागतिक क्रमवारीत ती २९ व्या स्थानावर आहे. 

...मग धोनीच्या ग्लोव्ह्जची चर्चा तर होणारच

पुरुष गटातही भारताच्या पदरी निराशाच पदरी पडली. पुरुष एकेरीमध्ये स्पर्धेतील सहाव्या मानांकित समीर वर्मासोबत बी साईप्रणीतला पराभव स्वीकारावा लागला. तर  दुहेरीत सात्विक साइराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने हार पत्करली. 

जागतिक बॅडमिंटनच्या क्रमवारीत १२ व्या स्थानी असलेल्या समीरला चीनच्या ताइपे के वांग जू वुई याने २१-१६,७-२१,२१-१३ अशी मात दिली. तर स्पर्धेत दुसरे मानंकन मिळालेल्या प्रणीतला एंथोनी सिनिसुकाने २५-२३,२१-९ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.