पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Australian Open: नवी थीम दिसणार की जोकोव्हिचच भारी ठरणार?

थीम वर्सेस जोकोव्हिच

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत डॉमिनिक थीम पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यफेरीत ३ तास आणि ४२ मिनिटे चाललेल्या सामन्यात पाचव्या मानांकित थीमने जर्मनीच्या सातव्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हला ३-६, ६-४,७-६(७-३), ७-६(७-४) अशा फरकाने पराभूत केले. अंतिम सामन्यात थीम समोर जागतिक टेनिस क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचचे आव्हान असणार आहे. 

मॅच सुपर ओव्हरमध्ये कशी न्यावी हे न्यूझीलंडकडून शिकावं!

जोकोव्हिचने सातवेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहे. तो आठव्यांदा स्पर्धा जिंकून आपल्या ग्रँडस्लॅममध्ये भर घालणार की वर्षाच्या सुरुवातीच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत थीम नवा इतिहास रचणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मागील वर्षी थीमला ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. आपल्या कारकिर्दीतील थीम तिसऱ्यांदा एखाद्या ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत खेळताना दिसणार आहे. यापूर्वी २०१८ आणि २०१९ मध्ये फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. पण दोन्ही वेळा त्याला राफेल नदालने पराभूत केले होते. पुरुष एकेरीतील अंतिम सामना हा रविवारी रंगणार आहे.  

...म्हणून क्रिकेट चाहते विराटवर भडकले

तत्पूर्वी महिला एकेरीत अमेरिकेची सोफिया केनिन आणि दोनवेळची ग्रँडस्लॅम विजेती स्पॅनिश गर्ल गार्बिन मुगुरुझा यांच्यात रंगत पाहायला मिळणार आहे. २३ वेळा ग्रँडस्लॅम जिंकणारी सेरेना विल्यम्स आणि तिची उत्तराधिकारी समजली जाणारी १५ वर्षीय कोको गॉफ यांच्या चर्चेत सोफिया केनिन दुर्लक्षित झाली. मात्र तिने कोर्टवरील आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष आता आपल्याकडे वेधले आहे. तर दुसरीकडे २०१४ नंतर पहिल्यांदा बिगर मानांकित गटातून कोर्टवर उतरण्याची वेळ गार्बिनवर आली होती. त्यामुळे दोघींसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आणि उत्सुकतेचा असाच असेल.