पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Australian Open: अमेरिकेची नवी क्वीन ऑस्ट्रेलिन ओपनची विजेती

सोफिया केनिन

ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या सोफिया केनिनने दोन वेळच्या ग्रँडस्लॅम विजेत्या स्पॅनिश गर्ल गार्बिन मुगुरुझाला पराभूत करत कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅमवर नाव कोरले. सेरेना विल्यम्स आणि तिची उत्तराधिकारी समजली जाणारी १५ वर्षीय कोको गॉफ यांच्या चर्चेमुळे दुर्लक्षित झालेल्या सोफिया केनिनने वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅमवर नाव कोरले. कारकिर्दीतील तिचे हे पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. 

Under-19WC: भारत-पाक मेगा लढतीपूर्वी दोन्ही संघातील रेकॉर्डवर एक नजर

सोफिया आणि गार्बिन यांच्यातील सामना २ तास ३ मिनिटे इतका वेळ चालला.  गार्बिन मुगुरुझाने पहिला सेट ६-४ असा जिंकत सोफियाला बॅकफूटवर ढकलले होते. मात्र पहिला सेट गमावल्यानंतर दमदार कमबॅक करत सोफियाने ऐतिहासिक विजय नोंदवला. सोफियाने ४-६, ६-२, ६-२ अशा फरकाने गार्बिनला पराभूत केले. महिला टेनिसच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अश्ले बार्टीला पराभवाचा धक्का देत सोफियाने फायनल गाठली होती. तर टेनिस जगतात दबदबा असलेल्या सिमोनला पराभूत करत गार्बिनने अंतिम फेरी गाठली होती. 

Photos : ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धाै नव्या सम्राज्ञीनं गाजवली

रशियन ब्युटी मारिया शारापोव्हानंतर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी सर्वात युवा खेळाडू होण्याचा मान सोफियाने मिळवला आहे. २१ वर्षीय सोफियाला १४ वे मानांकन मिळाले होते. एकही ग्रँडस्लॅम नावे नसल्यामुळे सुरुवातीपासूनच तिच्याकडून कोणीही उच्च दर्जाच्या खेळाची अपेक्षा केली नव्हती. पण तिने आपल्यातील क्षमता दाखवत ऐतिहासिक विजयासह आपलं नाणं खणखणीत असल्याचे दाखवून दिले.

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Australian Open 2020 Womens Singles final American Sofia Kenin beat Garbine Muguruza and win first grand slam of his career