पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सेरेनाचा खेळ खल्लास! शतकी विजयासाठी फेडररलाही करावा लागला संघर्ष

रॉजर फेडररचा ऑस्ट्रेलिय ओपनमध्ये शंभरावा विजय

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत शुक्रवारचा दिवसही भारतीय टेनिस चाहत्यांसाठी निराशजनक राहिला. पहिल्या फेरीत दिमाखदार कामगिरी करणाऱ्या भारताच्या जेविज शरणला दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. ग्रँडस्लॅम स्पर्धेत दुसऱ्या फेरीतच त्याच्यावर गाशा गुंडाळण्याची वेळ आली. पुरुष दुहेरीत देविज शरण आणि त्याचा न्यूझीलंडचा साथीदार अर्चेम सिताक यांना ब्राझीलच्या ब्रूनो सोरेस आणि क्रोएशियाच्या मेट पेपिकने संघर्षमय लढतीत पराभूत केले.

NZvsIND : राहुल-विराटनं पाया रचला अन् श्रेयसने विजयाचा कळस चढवला!

पुरुष दुहेरीतील दुसऱ्या फेरीत १ तास १७ मिनिटे चाललेल्या लढतीत शरण-सिताक जोडीला ७-६, ६-२, ६-३ असा पराभव स्वीकारावा लागला.  दुसरीकडे महिला एकेरीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सचा ऑस्ट्रेलियन ओपनमधील प्रवास संपुष्टात आला आहे. सात वेळा ऑस्ट्रेलियन ओपन गाजवणाऱ्या सेरेनाला चीनच्या २८ वर्षी वांग कियांगने पराभवाचा धक्का दिला. तब्बल  २ तास ४० मिनिटे चाललेल्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात कियांगने सरेनाला ६-४,७-६ (२-७), ७-५ अशा फरकाने नमवले.    

लेकीला राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान न मिळाल्यान वडील नाराज

पुरुष एकेरीत रॉजर फेडररला ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनने चांगलेच दमवल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात फेडरर पराभूत होता होता वाचला. ऑस्ट्रेलिया ओपनमधील १०० वा विजय मिळवण्यासाठी फेडररला टाय ब्रेकरपर्यंत झुंज द्यावी लागली. ४ तासांपेक्षा अधिवेळ चाललेल्या सामन्यात अखेरच्या क्षणापर्यंत रंगत पाहायला मिळाली. फेडररने ४-६, ७-६ (२), ६-४, ४-६,७-६ (१०-८) या फरकासह शतकी सामना जिंकला.   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Australian Open 2020 serena williams knocked out by china wang qiang in third round Roger Federer Wins Epic Five Set Thriller Over John Millman