पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

australian open सानियानं अर्ध्या सामन्यानंतर सोडली नादियाची साथ

सानिया आणि नादिया

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाला वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतून माघार घेण्याची वेळ आली आहे. मिश्र दुहेरीतून आपले नाव मागे घेतल्यानंतर सानिया मिर्झा युक्रेनच्या नादिया किचेनोकच्या साथीने महिला दुहेरी प्रकारात कोर्टवर उतरली. मात्र दुखापतीमुळे तिला सामना अर्ध्यावर सोडावा लागला. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेपूर्वी सानिया-नादिया जोडीनं होबार्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवली होती. या कामगिरीनंतर पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत ही जोडी कमालीची कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती. मात्र सानियाच्या दुखापतीमुळे अखेर या जोडीचा प्रवास पहिल्या फेरीतच थांबला. 

'जितना उसके सिर पर बाल नहीं उतना मेरे पास माल है'

या स्पर्धेत सानिया मिर्झा मिश्र दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्नासोबत कोर्टमध्ये उतरणार होती. मात्र पोटरीचा स्नायू दुखावल्यामुळे तिने मिश्र दुहेरीत न खेळता महिला दुहेरीवर फोकस करण्याचा निर्णय घेतला होता. पण महिला दुहेरीतही तिला पहिल्याच फेरीत अर्ध्यावर मैदान सोडण्याची वेळ आली. होबार्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविणारी सानिया-नादिया जोडी ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीत चीनच्या शिंयुआन हान आणि लिन झू यांच्या विरोधात कोर्टवर उतरली होती. 

...म्हणून सानिया मिर्झा ऑस्ट्रेलियात रोहनसोबत कोर्टवर उतरणार नाही

या जोडीने पहिला सेट २-० असा गमावला. त्यानंतर ०-१ असा स्कोअर असताना सानियाने सामना सोडण्याचा निर्णय घेतला. सानियाला पहिल्या सेटनंतर मेडीकल टाईम आउट घ्यावे लागले. दुसऱ्या सेटच्या सुरुवातीलाच चीनी प्रतिस्पर्ध्यांनी सानियाची सर्विस ब्रेक केली. त्यानंतर सानियाने माघार घेतली. २७ महिन्यानंतर होबार्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून सानियाने जोरदार कमबॅक केले होते. सानिया-नादिया जोडीने हा किताबही जिंकला होता. याच अंतिम सामन्यात ड्रॉप शॉट खेळताना तिला दुखापत झाली होती. सानियाच्या अनुपस्थितीत रोहन बोपन्ना नादियाच्या साथीनं मिश्र दुहेरीत उतरणार आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: australian open 2020 sania mirza retires from women doubles 1st round match with calf injury