पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Australian Open : फेडररनं विक्रमी विजयी परंपरा कायम राखली

रॉजर फेडरर

वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेला सोमवारपासून सुरूवात झाली. महिला गटात अमेरिकेच्या १५ वर्षीय कोको गौफने व्हिनस विल्यम्सला पराभवाचा धक्का देत सर्वांचे लक्ष वेधले. दुसरीकडे पुरुष एकेरीत स्वित्झर्लंडचा दिग्गज आणि स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने पहिल्या फिरित एकहाती विजय नोंदवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. २० वर्षांपूर्वी याच स्पर्धेतून पदार्पण करणाऱ्या फेडररने पहिल्या फेरीतील विजयी परंपरा कायम ठेवत एक अनोखा विक्रम आपल्या नावे नोंदवला. 

Australian Open : १५ वर्षांच्या मुलीनं विल्यम्सला दिला पराभवाचा धक्का

सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेदेपदावर नाव कोरणाऱ्या ३८ वर्षीय फेडररने पहिल्या फेरीत अमेरिकेच्या  स्टिव्ह जॉनसन याला ६-३, ६-२, ६-२ अशा सरळ सेटमध्ये पराभूत  करत एकहाती विजयाची नोंद केली. फेडररने आतापर्यंत २० ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवली आहेत. यात त्याने तब्बल सहावेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा गाजवली आहे. अनुभवाच्या जोरावर धमाकेदार खेळ दाखवून  २१व्या ग्रँड स्लॅमचे स्वप्न साकारण्याच्या इराद्याने तो मैदानात उतरला आहे. 

न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारताचा प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील पहिल्या सामन्यात त्याला सहज विजय मिळाला असला तरी पुढचे आव्हान त्याच्यासाठी सहज आणि सोपे नाही. या स्पर्धेपूर्वी त्याने फारसा सरावासाठी वेळही दिलेला नाही. त्यामुळे त्याचा प्रवास खडतर असाच असणार आहे. सरावाशिवाय कोर्टवर उतरलेला फेडरर अनुभवाच्या जोरावर कुठपर्यंत मजल मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.