पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जोकोव्हिचनं साम्राज्य राखलं! थीमला नमवत विक्रमी ग्रँडस्लॅमवर कब्जा

नोव्हाक जोकोव्हिच

जागतिक टेनिस क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचनं आठव्यांदा ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकत नवा विक्रम प्रस्थापित केला. रविवारी मेलबर्न पार्कवर रंगलेल्या अंतिम लढतीत त्याने ऑस्ट्रेलियाच्या डॉमिनिक थीमला ६-४,४-६,२-६,६-३,६-४ अशा फरकाने पराभूत केले. जोकोव्हिचचे हे १७ वे ग्रँडस्लॅम जेतेपद आहेत. 

Australian Open: अमेरिकेची नवी क्वीन ऑस्ट्रेलिन ओपनची विजेती

टेनिस जगतात सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम हा रॉजर फेडररच्या नावे आहे. त्याने आतापर्यंत २० वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. पहिल्या सेटमध्ये जोकोव्हिचन ६-४ अशी आघाडी मिळवली होती. दुसऱ्या सेटमध्ये त्याची सामन्यावरील पकड निसटली. थीमने कमबॅक करत  ६-२ आणि ६-३ असे सलग दोन सेट जिंकत जोकोव्हिचची आघाडी भेदून काढली.

NZvIND: न्यूझीलंड जिंकता जिंकता पुन्हा हरले, टीम इंडियाचा ऐतिहासिक 'पंच'

थीमचा खेळ जोकोव्हिचसमोर भारी पडतोय असे वाटत असताना गेममध्ये पुन्हा वळण मिळाल्याचे पाहायला मिळाले. अखेर सर्वाधिकवेळा ऑस्ट्रेलियन ओपन गाजवणाऱ्या जोकोव्हिचने दिमाखात पुनरागमन करत उर्वरित दोन्ही सेट ६-३, ६-४ अशा फरकानी जिंकत आठव्यांदा ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅमवर कब्जा केला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Australian Open 2020 Mens Final Novak Djokovic beat Dominic Thiem in Melbourne and wins 17th Grand Slam