पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Australian Open : १५ वर्षांच्या मुलीनं विल्यम्सला दिला पराभवाचा धक्का

 कोको गौफ आणि व्हिनस विल्यम्स

ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत १५ वर्षाच्या तरुणीनं धक्कादायक निकालाची नोंद केली आहे. अमेरिकेच्या कोको गौफ हिने आपल्याच देशाच्या अनुभवी व्हिनस विल्यम्सला पहिल्याच फेरीत गारद केले. १५ वर्षीय कोकोने व्हिनसचा ७-६ (७-५), ६-३ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.दुसऱ्या फेरीत कोकोची लढत रोमानियाच्या सेरेने क्रिस्टाविरुद्ध होणार आहे.  

न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारताचा प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त

अमेरिकेच्या १५ वर्षाच्या कोको गौफने आपल्या कामगिरीने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या वयाच्या दुप्पट आणि सात वेळा ग्रँडस्लॅम विजेती व्हिनस विल्यम्सला तिने दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेत पराभवाचा धक्का देत घरचा रस्ता दाखवला. मागील वर्षात विम्बल्डनच्या पहिल्या  फेरीत कोकोने व्हिनसला पराभूत केल्याचे पाहायला मिळाले होते.  त्यानंतर तिने ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये पुन्हा एकदा विम्बल्डनच्या आठवणी ताज्या केल्या. सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना कोको म्हणाली की, पहिल्या फेरीत व्हिनस विल्यम्सशी दोन हात करावे लागणार यामुळे मी नर्व्हस होते. ड्रॉ पाहिल्यानंतर मला धक्का बसला होता. पण सामन्यात मला यश मिळाले.  

INDvsAUS: या तीन कारणामुळे कांगारुंची शिकार शक्य झाली!

एकेकाळी महिला टेनिसच्या जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानापर्यंत मजल मारणारी व्हिनस  कोको विरुद्धच्या सामन्यात सुरुवातीपासून संघर्ष करताना दिसली. पहिल्या टाय ब्रेकर सेटमध्ये युवा कोकाचे फटके परतवण्यात ती असमर्थ ठरली. व्हिनस बॅकफूटवर असल्याचे लक्षात येताच कोकोने आपल्यातील सर्वोत्तम खेळ दाखवत सामन्यात बाजी मारली. इथून पुढे ती कुठेपर्यंत प्रवास करणार हे सांगणे फार कठीण असले तरी या विजयाने तिचा आत्मविश्वास द्विगुणित होण्यास मदत होईल. याचा ती कसा फायदा करुन घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.