पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मानसिक आरोग्याच्या कारणावरून मॅक्सवेलची क्रिकेटमधून विश्रांती

ग्लेन मॅक्सवेल

ऑस्ट्रेलियन संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलनं अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. श्रीलंकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा T20I सामना सुरू आहे. या सीरिजच्या मध्यातून मॅक्सवेलनं माघार घेतली आहे. मानसिक आरोग्याच्या कारणावरून मॅक्सवेलनं विश्रांती घेतली आहे. 

IND vs BAN : हवेचा दर्जा खालावला, तरीही पहिला सामना दिल्लीतच होणार !

मेलबर्नमध्ये श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या सामन्याचा मॅक्सवेल भाग नसेल. त्याचप्रमाणे आगामी पाकिस्तानविरुद्ध सामान्यांतही मॅक्सवेल खेळणार नसल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं स्पष्ट केलं आहे. मॅक्सवेल कधी  परतणार याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

'दादा'सोबत सेल्फी काढण्यासाठी विमानतळावर चाहत्यांची गर्दी

'मानसिक आरोग्यासंबधीत काही अडचणींना मॅक्सवेलला समोरं जावं लागत आहे. ज्यामुळे त्यानं काही काळापुरता  खेळांतून विश्रांती घेण्याचं ठरवलं आहे. काही समस्या ग्लेनला जाणवल्या, यावर तोडगा काढण्यासाठी तो स्वत:हून काम करत आहे', अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघाचे मानसोपचार तज्ज्ञ  डॉक्टर मायकल यांनी दिली आहे.