पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून 'टॉस'साठी तीन 'कॅप्टन' मैदानात

ऑस्ट्रेलि आणि श्रीलंका महिला क्रिकेट सामन्यावेळी हा प्रकार घडला

ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील सलामीच्या सामन्यात श्रीलंकन महिलांना ४१ धावांनी पराभूत करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे या सामन्याच्या नाणेफेकीची चर्चा सध्या चांगलीच रंगत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच नाणेफेकसाठी तीन कर्णधार मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. याच कारणही मजेशीर असे होते. 

'जेव्हा धोनी भाई परतला तेव्हा अश्रू अनावर झाले होते'

मेग लेनिंग ही ऑस्ट्रेलियन संघाची कर्णधार आहे. मात्र नाणेफेकसाठी कर्णधार म्हणून एलिसा हिली मैदानात आली होती. त्यामुळे नाणेफेकीच्या वेळी श्रीलंकन कर्णधार चमारी अट्टापट्टू आणि ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंग आणि टॉससाठीची कर्णधार एलिसा हिली असे चित्र पाहायला मिळाले. 

नाणेफेक जिंकण्यामध्ये मी 'अनलकी' आहे, असे मेग लनिंगने सांगितले आहे. इंग्लंडविरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेत तिला केवळ दोनवळा नाणेफेक जिंकता आली होती. याशिवाय एकदा तिने विंडीजविरुद्ध नाणेफेक जिंकली होती. नाणेफेकीचे माझे रेकॉर्ड खूप खराब आहे. एलिसाने काहीतरी बडबड करत नाणेफेक  जिंकल्याचेही तिने म्हटले आहे. 

पंत चुका करतोय, पण... गांगुलीच्या लेखणीतून

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन महिला संघाने निर्धारित २० षटकात ४ बाद  २१७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकन कर्णधार  चमारी अट्टापट्टूने ११३ धावांची झुंजार खेळी केली पण तरीही श्रीलंकेला ४१ धावांनी पराभूत व्हावे लागले.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:australia women cricket team captain meg Lanning calls on Alyssa Healy for coin toss know the reason