पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वॉर्नर-स्मिथ जोडीसमोर लंकेचा खेळ खल्लास!

वॉर्नर-स्मिथ

ब्रिसबेनच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा श्रीलंकेला एकहाती पराभूत केले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. या सामन्यात प्रथम फंलदाजी करताना श्रीलंकेने ऑस्ट्रेलियासमोर ११८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. 

ऑसीकडून लंका नेस्तानाबूत! संघाला वॉर्नर एवढ्याही धावा करता आल्या नाही

या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. मलिंगाने कर्णधार अ‍ॅरॉन फिंचला पहिल्याच चेंडूवर बाद करत श्रीलंकेच्या आशा पल्लवित केल्या. मात्र वॉर्नर-स्मिथ जोडीनं लंकेच्या आशेवर पाणी फेरले. पहिल्या सामन्यात नाबाद शतकी खेळी करणाऱ्या वॉर्नरने ४१ चेंडूत ९ चौकाराच्या मदतीने  नाबाद ६० आणि स्मिथने ३६ चेंडूत ६ चौकाराच्या मदतीने नाबाद ५३ धावांची खेळी करत १३ व्या षटकातच सामन्यावर विजयी मोहर उमटवत तीन सामन्यांची मालिका खिशात घातली.      

भारत-बांगलादेश सामन्यावर प्रदूषणाचे सावट

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेन फलंदाजांना ऑस्ट्रिलियन गोलंदांनी चांगलेच दमवलं. कुशल परेरा (२७) आणि सलामीवीर (२१) या दोन फलंदाजांशिवाय अन्य कोणालाही मैदानात तग धरता आला नाही. ऑस्ट्रेलियाने लंकेचा डाव १९ षटकात ११७ धावात आटोपला होता.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Australia vs Sri Lanka 2nd T20I David Warner and Steven Smith Half Century Australia thrash Sri Lanka by 9 wkts