Australia vs Pakistan, 2nd Test at Adelaide: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने ७००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने १९४६ चा विक्रम मोडला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाकडून सर्वांधिक धावा बनवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकून ११ व्या स्थानी तो आला आहे. स्मिथने पाकिस्तानविरोधातील दुसऱ्या कसोटीत एक धाव घेत हा विक्रम मागे टाकला. त्याने ७३ वर्षे जुना इंग्लंडच्या वेली हामंडचा विक्रम मोडला. स्टिव्ह स्मिथ ६४ चेंडूत ३६ धावा काढून तंबूत परतला. शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर रिझवानने त्याचा झेल टिपला.
इंग्लंडचे वेली हामंड यांनी १३१ डावांत ७००० धावा पूर्ण केल्या होत्या. तर स्मिथचा हा १२६ वा डाव होता. भारताच्या वीरेंद्र सेहवागने १३४ डावांत या धावा पूर्ण केल्या होत्या. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टि्वट करत म्हटले की, 'सर्वांत वेगवान ७००० धावा. तू स्टार आहेस स्टिव्ह स्मिथ.'
BCCI चा मोठा निर्णय, IPL मध्ये नो बॉलसाठी 'या' तंत्राचा वापर
स्मिथने ब्रॅडमन यांनाही मागे टाकले. ब्रॅडमन यांच्या नावे ६९९६ धावा आहेत. स्मिथने याचवर्षी अॅशेज मालिकेत सात डावांमध्ये ७७४ धावा केल्या होत्या.
Another record broken for the outstanding Steve Smith! @Domaincomau | #AUSvPAK pic.twitter.com/pjmEKY7BKk
— cricket.com.au (@cricketcomau) November 30, 2019
स्टिव्ह स्मिथने ब्रिस्बेन येथील पहिल्याच कसोटीत हा विक्रम आपल्या नावे केला असा. परंतु, तो चार धावांवर धावबाद झाला. आता त्याचे लक्ष्य हे ग्रेग चॅपेल यांच्या पुढे जाण्याचे असेल. ग्रेग चॅपेल यांच्या नावे ७११० धावा आहेत. ऑस्ट्रेलियाकडून रिकी पाँटिंगने १६८ कसोटीत सर्वाधिक १३३७८ धावा केल्या आहेत.
मातृत्वानंतर सानिया मिर्झा नवी इनिंग सुरु करण्यास सज्ज
कसोटीत सर्वांत वेगवान १००० धावाः
१०००- हर्बर्ट सूटक्लिफ/सर एवर्टन विक्स (१२ डाव)
२०००- डॉन ब्रॅडमन (२२ डाव)
३०००- डॉन ब्रॅडमन (३३ डाव)
४०००- डॉन ब्रॅडमन (४८ डाव)
५०००- डॉन ब्रॅडमन (५६ डाव)
६०००- डॉन ब्रॅडमन (६८ डाव)
७०००- स्टिव्ह स्मिथ (१२६ डाव)
८०००- कुमार संगकारा (१५२ डाव)
९०००- कुमार संगकारा (१७२ डाव)
१००००- ब्रायन लारा/सचिन तेंडूलकर/कुमार संगकारा (१९५ डावा)
१००० धावांना स्पर्श करताना स्मिथची सरासरी (सामन्याच्या शेवटी):
१०००- ३६.४०
२०००- ५०.३८
३०००- ५६.२७
४०००- ५८.५५
५०००- ६०.९८
६०००- ६३.७५
७०००- ६४.२२*
सर्वांत वेगवान ७००० कसोटी धावा
१२६ डाव- स्टिव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
१२१ डाव- वेली हामंड (इंग्लंड)
१३४ डाव- वीरेंद्र सेहवाग (भारत)
१३६ डाव- सचिन तेंडूलकर (भारत)
१३८ डाव- सर गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज), कुमार संगकारा (श्रीलंका), विराट कोहली (भारत)
१४० डाव- सुनील गावसकर (भारत), व्हिवीयन रिचर्ड्स (वेस्ट इंडिज)