पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्मिथच्या खेळीनं कांगारुंचा पाकविरुद्धच्या हारारकीचा खेळ खल्लास!

स्टीव्ह स्मिथ

स्टीव्ह स्मिथच्या नाबाद ८० धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाहुण्या पाकिस्तानी संघाला पराभूत करत तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर उर्वरित सामन्यात वर्चस्व गाजवून मालिकेवर कब्जा करण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरले होते. 

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने कर्णधार बाबर आझम (५०) आणि आणि इफ्तिखार अहमदच्या नाबाद ६२ धावांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने निर्धारित २० षटकात ६ बाद १५० धावांपर्यंत मजल मारली होती. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ९ चेंडू आणि ३ गडी राखून सहज पार केले. 

China Open : सिंधूचा खेळ खल्लास! बिगर मानांकित प्रतिस्पर्ध्यासमोर हतबल

वॉर्नर आणि फिंचने संघाच्या डावाला सुरुवात केली. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत नाबाद खेळी करुन लक्षवेधून घेतलेला वॉर्नर अवघ्या २० धावा करुन परतला. त्यानंतर फिंचने १७ धावांचे योगदान दिल्यावर मैदान सोडले. बेन मॅक २१ धावा करुन तंबूत परतला. स्टीव्ह स्मिथने सर्व सूत्रे आपल्या हाती घेत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने ५१ चेंडूत ८० धावांची नाबाद खेळी केली. या खेळीबद्दल त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

गावाकडच्या आठवणी सांगत अजिंक्य म्हणाला, शेतकरीच रिअल हिरो

ऑस्ट्रेलियाचा मागील ६ टी-२० सामन्यात सलग विजयाची नोंद केली असली तरी पाकिस्तान विरुद्धचा हा विजय ऑस्ट्रेलियासाठी खास असा आहे. पाकिस्तानने यापूर्वी सहावेळा ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. सातव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्धची पराभवाची मालिका खंडीत केली.