पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : जेम्सनं गल्लीतील पोरासारखी विचित्र पद्धतीनं फेकली विकेट

जेम्स विचित्र पद्धतीने बाद झाला

Australia vs New Zealand, 3rd Test Match at Sydney: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात जेम्स पॅटिंसन विचित्र प्रकारे बाद झाल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाने या मालिकेतील दोन सामने जिंकून या सामन्यापूर्वीच मालिका खिशात घातली आहे. तिसऱ्या सामन्यातही दबदबा कायम असताना ऑस्ट्रेलिय गोलंदाजावर हास्यास्पद बाद होण्याची नामुष्की ओढावली.  

न्यूझीलंडच्या नील वॅग्नरने टाकलेल्या शॉर्ट चेंडूवर जेम्स पॅटिंसन चांगलाच गडबडल्याचे पाहायला मिळाले. चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवण्याचा त्याचा प्रयत्न फसला. हा चेंडू पहिल्यांदा त्याच्या खांद्यावर आदळला नंतर ग्लोव्ह्जला लागून चेंडू यष्टिच्या दिशेने गेला. चेंडू रोखण्याच्या नादात जेम्सची बॅट स्टंपला लागली अन् त्याला तंबूत परतावे लागले. हा प्रकार म्हणजे गल्ली क्रिकेटमध्ये एखाद्या पोरानं दांडीला बॅट लावल्यावर बाद व्हावं अशीच होती.  

Video : असं कवा कुणी 'बोल्ड' होतं का राव!

तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ४५४ धावा केल्या आहेत. त्यानंतर नॅथन लायनच्या फिरकीच्या जोरावर कांगारुंनी किवींचा पहिला डाव अवघ्या २५१ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियन संघ न्यूझीलंडला क्लीन स्वीप देण्याच्या वाटेवर आहे.  लायनशिवाय या सामन्यात लाबुशेनने दमदार द्विशतकी खेळी केल्याचे पाहायला मिळाले. नव्या वर्षात द्विशतक झळकवणारा तो पहिला फंलदाज ठरलाय. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Australia vs New Zealand James Pattinson strangest dismissals in cricket history watch video at aus vs nz at sydney cricket ground