पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्मिथ भारी खेळला, पण 'विराट' स्मित हास्य लाभलं कोहलीलाच!

स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली

ऑस्ट्रेलियन संघ तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारतामध्ये दाखल झाल्यापासून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात तुलना व्हायला सुरुवात झाली होती. काही क्रिकेट समीक्षकांनी एकदिवसीयमध्ये स्मिथची विराट कोहलीशी तुलना होऊ शकत नाही, अशा आशयाच्या प्रतिक्रिया ही उमटल्याचे पाहायला मिळाले. मालिकेतील तीन सामन्यांचा विचार केला तर ही दोघही आपापल्या संघासाठी उत्तम खेळले. 

INDvsAUS : कोहलीची आणखी एका 'विराट' विक्रमाला गवसणी

स्टीव्ह स्मिथला मुंबईच्या मैदानात फलंदाजीला नंबरचा आला नाही. त्यानंतर राजकोटच्या मैदानात त्याने ९८ धावांची दमदार खेळी साकारली. पण त्याची ही खेळी संघाचा पराभव टाळू शकली नाही. पहिल्या सामन्यात विराट कोहली अवघ्या १६ धावांवर बाद झाला होता. परिणामी भारतीय संघाला एकहाती पराभवाचा सामना करावा लागला.  राजकोटच्या मैदानात कोहलीने ७८ धावांची खेळी केली. 

पहिल्या दोन सामन्यानंतर स्मिथ एका डावासह ९८ धावा करुन आघाडीवर होता. तर  विराट कोहली दोन डावातील खेळीसह ९६ धावा करुन दुसऱ्या क्रमांकावर होता. निर्णायक सामन्यात या दोघांच्यात कोण भारी ठरणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. प्रथम फलंदाजी करताना आघाडी कोलमडल्यानंतर स्टीव्ह स्मिथने १३१ धावांची खेळी करत आपल्या खेळीत सातत्य कायम असल्याचे दाखवून देत संघाचा डाव सावरला. तीन सामन्यातील दोन डावात त्याने २२९ धावा आपल्या नावे करुन मालिकावीराच्या यादीत आपले नाव आघाडीवर ठेवले. 

INDvsAUS: कांगारुंचा वचपा काढला, बंगळुरुमध्ये रोहित-विराट हिट शो!

ऑस्ट्रेलियाच्या धावांचा पाठलाग करताना कोहलीने ८९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या धावांसह तीन सामन्यांच्या मालिकेतील तीन डावात विराट कोहलीने १८३ धावा केल्या. तुलनात्मक रित्या स्मिथ विराटवर भारी पडला पण सामना भारताने जिंकल्यामुळे दोनशे धावांचा टप्पाही पार न करताही मालिकावीर म्हणून विराट कोहलीला गौरवण्यात आले. हा सन्मान म्हणजे सातत्य दोघांनीही दाखवलं पण 'विराट' स्मिथ हास्य कोहलीला लाभलं असंच होते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Australia Tour To India 2020 Steven Smith playing better than Virat Kohli but the series trophy goes to Indian Captain