पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोहली लय भारी! स्मिथची त्याच्याशी तुलनाच होऊ शकत नाही :गंभीर

विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ

India vs Australia, ODI Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेपूर्वी माजी सलामीवीर आणि भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी विराट कोहली हा स्मिथपेक्षा कैकपटीने भारी असल्याचे म्हटले आहे. सध्याच्या घडीला क्रिकेटच्या मैदानात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोह आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथची तुलना केली जाते. एकदिवसीय मालिकेत या दोघांमध्ये टक्कर असेल, अशी चर्चा देखील क्रिकेट वर्तुळात रंगत आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहली स्मिथच्या खूप पुढे असल्याचे गंभीरने म्हटले आहे. 

क्रिकेटच्या देवाला दिली कृष्णाची उपमा, कैफ म्हणाला फिलिंग लाइक सुदामा

एकदिवसीय सामन्यात स्मिथची तुलना कोहलीसोबत होऊ शकत नाही. आगामी मालिकेत ऑस्ट्रेलियन संघ स्मिथला कोणत्या क्रमांकावर खेळण्याची संधी देणार हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे, असेही गंभीर यांनी म्हटले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या सामन्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात गंभीर म्हणाले की, मर्यादित षटकांच्या सामन्यात स्मिथच्या तुलनेत कोहलीच भारी आहे. दोघांच्यामध्ये कोणतीही तुलना होऊ शकत नाही. भारताविरुद्धच्या मालिकेत स्मिथ कोणत्या क्रमांकावर खेळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

बुमराहला पॉली उम्रीगर पुरस्कार, शेफाली अन् पुनमचाही होणार सन्मान

ते पुढे म्हणाले, स्मिथला तिसऱ्या क्रमांकावर पाठवून ऑस्ट्रेलियन संघ मार्नस लाबुशेनला चौथ्या क्रमांकावर संधी देणार की स्मिथ चौथ्या क्रमांकावर खेळणार हे पाहणे महत्त्वाचे असेल. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी कांगारूंना हैराण करु शकतात, असेही गंभीर यांनी यावेळी म्हटले. शमी आणि बुमराह सध्या चांगली कामगिरी करत आहेत. ही जोडी फिंच-वॉर्नर जोडीगोळीसमोर कशी कामगिरी करणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Australia Tour To India 2020 india vs australia odi series Virat Kohli Far Ahead of Smith Smith There Is No Comparison says Gautam Gambhir