पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सामन्यानंतर विराट म्हणाला मी चुकलो!

विराट कोहली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकाऐवजी चौथ्या क्रमांकावर खेळायला आल्याचे पाहायला मिळाले. लोकेश राहुलने मिळालेल्या बढतीचं सोनं केले. पण विराच कोहली अवघ्या १६ धावा करुन परतल्यामुळे हा बदल भारतीय पराभवाच्या कारणापैकी एक असल्याची चर्चा रंगणे स्वाभाविक होते. सामन्यानंतर विराट कोहलीने याबाबत खुल्या मनाने आपली चूक मान्य केली आहे. 

INDvsAUS: कांगारुंची जबराट सलामी, दहा जणांनी केलेल्या धावा दोघांनीच कुटल्या

चौथ्या क्रमांकावर फंलदाजीला येणाचा निर्णय चुकला. राजकोटमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात यावर नक्कीच विचार करेन, असे विराट कोहलीने सामन्यानंतर सांगितले. रोहित शर्मा, शिखर धवन यांच्यासोबत लोकेश राहुललाही संघात संधी दिल्यामुळे विराटने रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर लोकेश राहुलला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले होते.  भारतीय संघाला नव्या वर्षातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात मिळालेल्या पराभवाबद्दल विराट म्हणाला की,  हा पराभव सहजतेने घ्यायला पाहिजे. एक सामना गमावला म्हणजे सर्व काही संपले असे होत नाही. मला काही प्रयोग करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकाराखाली मी आजच्या सामन्यात बदल केले.  आम्ही तिन्ही स्तरावर कमकुवत ठरलो. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाने तिन्ही स्तरावर सर्वोच्च कामगिरी केली, असेही विराटने म्हटले आहे. 

INDvsAUS: तुझं रक्त कधी उसळणार? पंत पुन्हा ट्रोल

या पराभवामुळे भारतीय संघासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान उभे राहिले आहे. मालिका जिंकण्यासाठी संघाला राजकोट आणि बंगळुरुचे मैदान मारावे लागणार आहे. राजकोटमध्ये मालिकेत बरोबरी करण्यासाठी भारतीय संघ कोणत्या बदलासह उतरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने एकहाती विजय मिळवत आतापर्यंत एकतर्फी विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला उर्वरित सामने सहज जिंकू देणार नाही, याचे संकेत दिले आहेत. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Australia tour of India 2020 india vs australia first odi we have to rethink about me batting at number four says virat kohli after match