भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ भारतात दाखल झाला आहे. यापूर्वीच्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाने भारताला मायदेशात पराभूत करुन दाखवले होते. ही पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने संघ मैदानात उतरेल. दुसरीकडे भारतीय संघ मागील पराभवाचा वचपा काढून कांगारुंची शिकार करण्यास उत्सुक असेल. भारतीय संघ सध्या दमदार फॉर्ममध्ये असला तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना एकतर्फी होणार नाही, असे वाटते. सध्याच्या घडीला भारतीय संघासमोर कोणत्याही संघाचा निभाव लागताना दिसत नाही. पण ऑस्ट्रेलियाचा संघात भारताला आव्हान देण्याची ताकद आहे.
IND vs SL: मालिका व सामनाही टीम इंडियाच्या खिशात
ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅरॉन फिंचने भारतात दाखल होताच विराटच्या वाघांना रोखण्याय यशस्वी ठरु असा विश्वास व्यक्त केलाय. तो म्हणाला की, भारतीय संघाला त्यांच्या भूमीवर पराभूत करणे खूपच कठीण टास्क आहे. पण स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरच्या पुनरागमनामुळे आम्हाला टीम इंडियाचे आव्हान परतवणे फार जड जाणार नाही. भारतीय संघाविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी करण्यासाठी आम्हाला आमची मागील कामगिरीत सातत्य ठेवावे लागणार आहे. कामगिरीत सुधारणा करण्याची गरज असल्याचेही त्याने म्हटले आहे.
VIDEO: केदार जाधवला सलमान खानने दिली खास भेट
सध्याच्या घडीला प्रत्येक टीम घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करताना दिसत आहे. क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण करण्यासाठी बाहेरच्या देशात जाऊन चांगली कामगिरी करुन दाखवण्याची गरज आहे. आम्ही भारताविरुद्ध ही मानसिकता घेऊनच मैदानात उतरु भारतीय ताफ्यात जलगती गोलंदाज जसप्रीत बुमराह चेंडू स्वींग करण्यात माहिर आहे. युजवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांच्या फिरकीत सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. या गोलंदाजांविरुद्ध सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. फिंचचे हे बोल भारताच्या प्रमुख गोलंदाजांचा अभ्यास करुनच ऑस्ट्रेलियन टीम दौऱ्यावर पोहचली असल्याचे संकेत देणारी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील सलामीचा सामना हा मुंबईच्या वानखेडे मैदानावर १४ जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.