पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsAUS: तुझं रक्त कधी उसळणार? पंत पुन्हा ट्रोल

ऋषभ पंत

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मुंबई येथील वानखेडेच्या मैदानात सुरु असलेल्या सामन्यात ऋषभ पंतने पुन्हा एकदा निराश केले. सलामीवीर रोहित शर्मा अपयशी ठरल्यानंतर धवन-लोकेश राहुल यांनी भारताचा डाव सावरला. पण मध्यफळीतील फलंदाजांनी पुन्हा निराश केले. कर्णधार विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतला अपेक्षित खेळी करता आली नाही. परिणामी भारतीय संघाचा पहिला डाव पाच चेंडू शिल्लक असताना २५५ धावांवर आटोपला.

INDvsAUS: ऋषभ जायबंदी, बढतीनंतर राहुलला विकेटमागेही मिळाली संधी

धवन-राहुलने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करुन मध्यफळीतील फलंदाजांचे टेन्शन कमी केले होते. युवा फलंदाज श्रेयस अय्यर पाठोपाठ कर्णधार विराट बाद झाल्यानंतर पंतकडे लक्षवेधी खेळी करण्याची संधी होती. मात्र तो पुन्हा अपयशी ठरला. पेट कंमिन्सच्या उसळत्या चेंडू हुक करण्याच्या नादात त्याने आपली विकेट गमावली. चेंडू बॅटची कड घेऊन हेल्मटवर आदळल्यानंतर कुठे गेला हे पंतला कळलेच नाही. टर्नरने कोणतीही चूक न करता त्याला झेलमध्ये रुपांतरित करत पंतला तंबूचा रस्ता दाखवला. कोणताही दबाव नसताना पुन्हा अपयशी ठरल्याने नेटकऱ्यांनी पंतवर निशाणा साधला आहे. 

INDvsAUS : सचिन-विराटला मागे टाकत रोहितची विश्वविक्रमाला गवसणी

एका नेटकऱ्याने कब खुन खोलेगा तेरा या फिल्मी डायलॉगच्या मिम्ससह पंतला कधी फार्मात येणार असा प्रश्न उपस्थित केलाय. दुसऱ्या एका नेटकऱ्याने 'क्रिश' चित्रपटातील बालिश ह्रतिक रोशनच्या इमेजसह मी पुन्हा नापास झालो, अशी पोस्ट केली आहे. मी संघर्ष करत आहे, अशी मिम्स देखील एका नेटकऱ्याने शेअर केली आहे. तर एका नेटकऱ्याने पंतला आणखी किती संधी देणार असा प्रश्न उपस्थित करत बीसीसीआयला संजू सॅमसनची आठवण करुन दिली आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर संजू सॅमसनला संधी न दिल्याने क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करत बीसीसीआयला प्रश्न विचारले होते. त्याचीच पुढची झलक वानखेडेतील पंतच्या खेळीनंतर सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Australia tour of India 2020 india rishabh pant faces the wrath of online trolls after failing to convert a good start during india vs australia 1st odi 2020 at Mumbai