पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पीटर सिडलची ३५ व्या वर्षी निवृत्ती

पीटर सिडल

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पीटर सिडलने आंतरराष्ट्रीय क्रिकटेमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया डॉट कॉमनुसार, सिडलने आपल्या जीवनातील या कठीण निर्णयाची घोषणा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडदरम्यानच्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशीचा खेळ सुरु होण्यापूर्वी केली. यावेळी ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडू उपस्थित होते. 

रिंगमध्ये मेरी कोमने अपशब्द वापरले, निखत झरीनचा आरोप

निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सिडलने म्हटले की, योग्य वेळ कोणती हे समजणे कठीण असते. पण टीमबरोबर अ‍ॅशेजच्या दौऱ्यावर जाणे, पार्टी करणे आणि क्रिकेट खेळणे, संघाचा हिस्सा बनणे हेच माझे मुख्य लक्ष्य होते. 

यावर्षी इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाकडे अ‍ॅशेज चषक कायम ठेवण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या सिडलने मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन आपल्या सहकाऱ्यांनी निवृत्तीची माहिती दिली. सिडलने आपल्या कारकीर्दीत ६७ कसोटीत २२१ बळी घेतले आहेत. त्याने या दरम्यान ८ डावांत पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेतले आहेत. 

विराटकडून साक्षीचं तोंडभरुन कौतुक!

सिडल ऑस्ट्रेलियाच्या सर्वांत यशस्वी कसोटी गोलंदाजांच्या यादीत १३ व्या स्थानी आहे. त्याने २०१० मध्ये ब्रिस्बेनमध्ये इंग्लंडविरोधात आपल्या २६ व्या वाढदिवशी हॅटट्रिक घेतली होती. त्याने ऑस्ट्रेलियाकडून २० एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि दोन टी-२० सामनेही खेळले आहेत.

मेरी कोमनं प्रतिस्पर्धी झरीनला रिंगबाहेरही फटकारले

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Australia pacer Peter Siddle announces retirement from international cricket before match starts