पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनमध्ये कोरोनाची लक्षणं

गोलंदाज केन रिचर्डसन

जगभरामध्ये जीवघेण्या कोरोना विषाणूने कहर केला आहे. कोरोना विषाणू झपाट्याने पसरत आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बँगलोरचा सदस्य केन रिचर्डसनमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली आहेत. न्यूझीलंडविरोधातील सामन्या आधी केन रिचर्डसनमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आल्यामुळे त्याला संघातून बाहेर करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ नुकताच अफ्रीका दौऱ्यावरुन आला आहे. 

 

शेअर बाजारात दाणादाण, निर्देशांक गडगडले, लोअर सर्किट लागू

ऑस्ट्रेलियाचा संघ आज सिडनी क्रिकेट मैदानावर पोहोचला. तेव्हा केन त्याठिकाणी नव्हता. गुरुवारी रात्री केनने टीमच्या वैद्यकीय कर्मचार्‍यांना घशात दुखत आणि खवखवत असल्याची तक्रार केली होती. ही लक्षणं कोरोना विषाणूसारखी असल्यामुळे केनच्या रक्ताची तापसणी करण्यात आली. रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र अद्याप अहवाल आला नाही. हा अहवाल निगेटिव्ह आल्यास तो त्वरित संघात सामील होऊ शकतो. 

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी माजी संचालकासह तिघांना अटक

ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'आमचे वैद्यकीय कर्मचारी सध्या घशातील संसर्ग म्हणून केनवर उपचार करत आहेत. परंतु आम्ही ऑस्ट्रेलिया सरकारच्या प्रोटोकॉलनुसार चाललो आहोत. केनला इतर सदस्यांपासून दूर ठेवले गेले आहे. त्याची तपासणी केली जात आहे. केनचा तपासणी अहवाल अद्याप आलेला नाही. तो १४ दिवसांपूर्वी परदेशी दौर्‍यावरुन परत आला होता.'

नमस्ते करण्याच्या पद्धतीवरून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताचे कौतुक!