पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऑसीकडून लंका नेस्तानाबूत! संघाला वॉर्नर एवढ्याही धावा करता आल्या नाही

डेव्हिड वॉर्नर

सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाहुण्या श्रीलंका संघाला १३४ धावांनी पराभूत केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. अ‍ॅडलेडच्या मैदानावर रंगलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी श्रीलंकेची चांगलीच धुलाई केली.

तमिमसाठी गुड न्यूज! पण, बांगलादेशचा संघ गोत्यात

डेव्हिड वॉर्नरने ५६ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने नाबाद १०० धावा कुटल्या.  कर्णधार अ‍ॅरॉन फिंच (६४) ग्लेन मॅक्सवेलने अवघ्या २८ चेंडूत केलेल्या ६२ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकात २३३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकन संघाला शंभरी देखील गाठता आली नाही. 

भाऊबीजपूर्वी सचिनने शेअर केली बहिणीने दिलेल्या स्पेशल गिफ्टची गोष्ट

श्रीलंकन फलंदाजांचा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. दसून शनाकाने केलेल्या १७ धावा या श्रीलंकन संघाची सर्वोच्च धावसंख्या त्यांची दैनिय अवस्थेची गाथा सांगणारी आहे. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू झम्पाने सर्वाधिक ३ तर स्टार्क आणि कमिन्सने प्रत्येकी २-२ बळी टिपले. एगरने १ बळी टिपला. ऑस्ट्रिलियन गोलंदाजांसमोर श्रीलंकेला निर्धारित २० षटकात ९ बाद ९९ धावांपर्यंत मजल मारता आली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: aus vs sl 1st T20 with the help of david warner brilliant century Australia beat Sri Lanka by 134 runs