ICC World Test Championship Point Table: नॅथन लायनचे ५ बळी आणि डेव्हिड वॉर्नरच्या तिशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला एक डाव आणि ४८ धावांनी पराभूत केले. या कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमावारीत दुसऱ्या स्थानावर कब्जा मिळवला. या क्रमवारीत भारतीय संघ अव्वलस्थानी कायम आहे.
ओपन चॅलेंज देणाऱ्या झरीनच्या स्वप्नाचा मेरी कोमकडून चक्काचुरा
पाकिस्तान विरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील दोन्ही सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने भारतासोबत शर्यतीत असल्याचे दाखवून दिले. मालिकेतील २-० विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या खात्यात खात्यात १७६ गुण जमा झाले आहेत. भारतीय संघ ३६० गुणासह अव्वलस्थानी आहे. पाकिस्तानच्या संघाला पराभूत करत ऑस्ट्रेलिया संघ भारताचा पाठलाग करताना दिसत आहे.
विस्डेनच्या टॉप ५ क्रिकेटर्समध्ये विराट कोहली
वर्ल्ड चँम्पियनशीपची गुण पद्धती खालीलप्रमाणे
#दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजेत्यास ६० गुण, मालिका बरोबरीत सुटली तर ३० आणि मालिका अनिर्णित राहिल्यास २० गुण दिले जातात.
# तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील विजेत्या संघाच्या खात्यात ४० गुणांची भर पडते. मालिका बरोबरीत राहिली तर २० आणि ड्रॉ राहिल्यास १३ गुण प्राप्त होतात.
#चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील मालिका विजेत्यास ३० गुण, मालिका बरोबरीत राहिल्यास १५ गुण तर सामना अनिर्णित राहिल्या १० गुण दिले जातात.
# पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील विजेत्यास २४ गुण, ही मालिका बरोबरीत सुटल्यास १२ गुण तर मालिका अनिर्णित राहिल्या १२ गुण दिले जातात (बरोबरी आणि अनिर्णित मालिकेच्या निकालामध्ये प्रत्येकी संघास समान गुणांची विभागणी करण्यात येते)
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांची मालिका सुरु आहे. वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात उद्यापासून २ सामन्यांच्या कसोटी मालिकेस सुरुवात होणार आहे.