ICC World Test Championship Point Table: नॅथन लायनने घेतलेले ५ बळी आणि डेव्हिड वॉर्नरच्या त्रिशकी खेळीच्या जोरावर कांगारुंनी पाहुण्या पाकिस्तानला दुसऱ्या कसोटीतही पराभूत करत मालिका २-० अशी खिशात घातली. ऑस्ट्रेलियाने अँडलेड कसोटीत पाकिस्तानला १ डाव आणि ४८ धावांनी पराभूत केले. मालिकेतील क्लीन स्वीपनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.
IPL 2020 Auction: ९७१ क्रिकेटर्सची नोंदणी, यात २०० हून अधिक परदेशी
मालिका २-० अशी जिंकल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खात्यात १७६ गुण जमा झाले. भारतीय संघ तब्बल ३६० गुणांसह अव्वलस्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत करत भारत आणि त्यांच्यातील गुणांचे अंतर कमी केले आहे.
दुसरीकडे प्रत्येकी ६०-६० गुणांसह न्यूझीलंड आणि श्रीलंका अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. इंग्लंड 56 गुणासह पाचव्या स्थानावर आहे. वेस्टइंडीज, पाकिस्तान, बांग्लादेश आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चँम्पियनशिपमध्ये अद्याप खातेही उघडू शकलेले नाहीत.
टी-20 विश्व विक्रम : १३ चेंडूत एकही धाव न देता ६ विकेट घेणारी मर्दानी!
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुण विभागणी
२ सामन्यांची कसोटी मालिका : विजय/बरोबरी/अनिर्णित =६०/३०/२०
३ सामन्यांची कसोटी मालिका: विजय/बरोबरी/अनिर्णित =४०/२०/१३
५ सामन्यांची कसोटी मालिका: विजय/बरोबरी/अनिर्णित =२४ /१२/८