ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना पर्थच्या मैदानात खेळवण्यात येत असून पहिला दिवस ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबूशेनने गाजवला. शतकी खेळी करणाऱ्या लाबूशेनशिवाय न्यूझीलंडचा गोलंदाज नील वॅगनरनेही अप्रतिम झेल टिपत सर्वांचे लक्ष वेधले. त्याने टीपलेल्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ICC T20I Batting Rankings: विराट टॉप-10 मध्ये, रोहितची घसरण
नीलने स्वत:च्या गोलंदाजीवर डेव्हिड वॉर्नरचा सुरेख झेल टिपला. सध्याच्या घडीला वॉर्नर चांगली कामगिरी करताना दिसत आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. त्यामुळे नीलने घेतलेली विकेट न्यूझीलंडसाठी मोठे यशच मानावे लागेल. वॉर्नरने संघाला चांगली सुरुवात करुन दिली मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारा दाखवून देत नीलने त्याला तंबूत धाडले. हा झेल होऊ शकतो, असे वॉर्नरलाही वाटले नव्हते. त्याच्या हावभावीवरुन ते स्पष्ट दिसून येते.
सचिन विराट नव्हे दीपिकाला आवडतो हा क्रिकेटर
पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने ४ बाद २४८ धावा केल्या असून मार्नस लाबूशेन ११० आणि ट्रॅविस हेड २० धावांवर खेळत आहेत. वॉर्नरने ७४ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने ४३ धावा केल्या. त्याच्यासह नीलने स्मिथलाही ४३ धावांवर बाद केले.
One of the best caught-and-bowled catches you'll see! @bet365_aus | #AUSvNZ pic.twitter.com/4XmXMkovZ3
— cricket.com.au (@cricketcomau) December 12, 2019