पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Eng vs Aus: पेन टीमच्या 'त्या' चुकीमुळे कांगारुंना पराभवाच्या वेदना

बेन स्टोक्स आणि पेन

बेन स्टोक्सच्या झुंजार आणि नाबाद शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने हातातून निसटलेला सामना जिंकत अ‍ॅशेस मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. इंग्लंडला रोमहर्षक विजय मिळवून देणाऱ्या बेन स्टोक्सचे सर्वत्र कौतुक होत असताना ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.  

ऑस्ट्रेलियन दिग्गज क्रिकटर्संनी संघाच्या वेदनादायी पराभवाचे खापर कर्णधान पेनच्या डोईवर फोडले. ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार इयान चॅपल यांनी अंतिम क्षणी पेनला शांत डोक्याने विचार करणे जमलं नाही, अशी टिप्पणी करत त्याच्यावर निशाणा साधला. ऑस्ट्रेलिया विजयाच्या उंबरठ्यावर असताना बेन स्टोक्सने १३५ धावांची अप्रतिम खेळी करत त्यांच्या तोंडचा घास पळवला. पहिल्या डावात अवघ्या ६७ धावांत गुंडाळलेल्या यजमानांसमोर ऑस्ट्रेलियाने ३५९ धावांचे आव्हान ठेवले होते.  

Ashes 2019 : स्टोक्सची अविश्वसनीय खेळी, इंग्लंडने मैदान मारलं

अखेरच्या टप्प्यात नॅथन लायनच्या गोलंदाजीवर बेन स्टोक्सविरोधात पायचितची अपिल पंचांनी फेटाळून लावली. रिप्लेमध्ये स्टोक्स बाद होता, असे दिसत होते. परंतु यापूर्वी ऑस्ट्रेलियाने आपला रिव्ह्यू गमावला होता. कर्णधार टिम पेनने अकरावा फलंदाज जॅक लीचविरोधात रिव्ह्यू गमावला होता. हाच मुद्दा पकडून चॅपल यांनी पेनवर निशाना साधला. सामन्यातील दबावामुळे पेनचा संयम ढासळला होता. त्यामुळेच त्याला लेग स्टंपच्या बाहेर टप्पा पडलेला चेंडू न ओळखता त्याने गोंधळून रिव्ह्यू घेतल्याचा उल्लेख चॅपल यांनी केला आहे. 

Video : हेझलवूडच्या बाउन्सरने स्टोक्सच्या हेल्मेटचे तुकडे

या क्षणी पेनला काय करावं हे सूचत नव्हते अशी टिप्पणी माजी कर्णधार मार्क टेलर यांनी केली आहे. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर असल्याचे स्पष्ट दिसत असताना त्याने रिव्ह्यू घेणे अपेक्षित नव्हते, असे सांगत पेनच्या निर्णयावर ताशेरे ओढले. विशेष म्हणजे सामन्यानंतर स्वत: पेनने रिव्ह्यूमध्ये चूक झाल्याचे कबूल केले. आतापर्यंत घेतलेले सर्व रिव्ह्यू चुकीचे ठरले. त्यामुळे ही जबाबदारी दुसऱ्याकडे देण्याचा विचार करत असल्याचेही त्याने सांगितले.