पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून सानिया मिर्झा ऑस्ट्रेलियात रोहनसोबत कोर्टवर उतरणार नाही

सानिया मिर्झा

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने बुधवारी ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेतील मिश्र दुहेरीतून माघार घेतली आहे. मिश्र दुहेरीत ती भारताच्याच रोहन बोपन्नाच्या साथीने कोर्टवर उतरणार होती. पण स्नायू दुखापतीमुळे तिने मिश्र दुहेरीत न खेळण्याच निर्णय घेतला आहे. या प्रकारातून ती माघार घेतली असली तरी ती महिला दुहेरीत मात्र खेळणार आहे.  

धोनीच्या निवृत्तीवर सेहवागची फटकेबाजी

गुरुवार सानिया मिर्झा यूक्रेनच्या नादिया किचनोकसोबत दुहेरीच्या कोर्टवर उतरणार आहे. नादियाच्या साथीनेच सानियाने  होबार्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती. सानिया-नादिया जोडीसमोर चीनच्या जिंनयुन हान- लिन जू यांचे आव्हान असेल. रोहित बोपन्नासह मिश्र दुहेरीत न खेळण्याचा निर्णय घेणं फार कठिण होते. होबार्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान झालेल्या दुखापतीतीमुळे हा निर्णय घ्यावा लागला. दुखापतीतून सावरले आहे. पण एकाच वेळी दोन्ही प्रकारात सहभागी होण्यापेक्षा महिला दुहेरीवर लक्षकेंद्रीत करण्याचा निर्णय घेतला, असे सानियाने 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सांगितले आहे.  

Under 19 World Cup : गोलंदाजाने नव्हे मशिनने तोडला अख्तरचा विक्रम!

मातृत्वानंतर सानिया मिर्झा दोन वर्ष कोर्टपासून दूर होती. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत विवाहबद्ध झालेल्या सानियाने २०१८ मध्ये मुलाला जन्म दिला होता. आक्टोबर २०१७ मध्ये तिने अखेरचा सामना खेळला आहे. होबार्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील दमदार कामगिरी दाखवून देत तिने दुसऱ्या इनिंगची चांगली सुरुवातही केलीय. असाच खेळ ती ऑस्ट्रेलियन ओपनमधील महिला दुहेरीत करण्यात उत्सुक असेल.