पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

MCG वरील विक्रमी गर्दी ही महिला क्रिकेटसाठी 'अच्छे दिन'चे संकेत

महिला टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये विक्रमी गर्दी पाहायला मिळाली. ( टी-20 वर्ल्ड कप ट्विटर)

ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियन महिलांनी पाचव्यांदा टी-२० विश्वचषक उंचावला. भारतीय महिलांची ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी त्यांनी हिरावून घेतली. स्पर्धा संपली पण विषय इथच संपत नाही तर आता महिला क्रिकेटला अच्छे दिन आल्याचे चित्र मेलबर्नच्या मैदानात पाहायला मिळाले. महिला क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी महिला क्रिकेटचा सामना पाहण्यास पसंती दर्शवली होती. जवळपास १ लाख प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी ८६ हजार १७४ प्रेक्षक उपस्थितीत होते. महिला क्रिकेटच्या मैदानातील हा एक विक्रमच आहे. 

Video : ..अन् शेफालीला अश्रू अनावर झाले!

भारताची माजी कर्णधार मिताली राज हिने याच गोष्टीचा दाखला देत महिला क्रिकेट आणखी लोकप्रिय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. महिला दिनी मेलबर्नच्या मैदानातील प्रेक्षकांनी लावलेल्या उपस्थितीचा उल्लेख करत मितालीने एक ट्विट केले आहे. मेलबर्नच्या मैदानातील गर्दी ही प्रत्येक दिवस तुमचा आहे, हेच सांगणारी असल्याचा उल्लेख करत महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन' आल्याची भावना तिने व्यक्त केली आहे.

INDvs SA ODI: पांड्या-धवनचे कमबॅक रोहितला विश्रांती

माजी क्रिकेटर आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांनी देखील महिला क्रिकेटमधील या विक्रमावर प्रतिक्रिया दिली आहे. काही वर्षांपूर्वी महिला क्रिकेट पाहण्याची कोणाचीही मानसिकता नव्हती. मेलबर्नच्या मैदानात हे चित्र बदलल्याचे पाहायला मिळाले. समाजातील अडथळे पार करुन भारतीय महिलांनी एक नव शिखर गाठल्याचे हे प्रतिक आहे, असा उल्लेख गंभीर यांनी केला आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Attendance records tumbled at the Womens Twenty20 World Cup final with 86 174 fans turning up to watch Australia beat India