पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप: अमित पांघलचा गोल्डन पंच

अमित पांघल

भारतीय बॉक्सर अमित पांघलने बँकॉक येथे सुरू असलेल्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. शुक्रवारी ५२ किलो वजनी गटात रंगलेल्या अंतिम सामन्यात त्याने कोरियाच्या किम इंक्यू याला पराभूत केले. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत अमितने सामन्यावर आपली मजबूत पकड मिळली होती. त्याच्या आक्रमणासमोर कोरियन प्रतिस्पर्धी सफशेल अपयशी ठरला.   

मागील वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत अमितने ४९ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले होते. त्यानंतर यंदाच्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत तो ५२ किलो वजनी गटातून बॉक्सिंगच्या रिंगणात उतरला होता. एका वजनी गटातून दुसऱ्या वजनी गटात खेळताना एक प्रकारचा दबाव असतो. मात्र, अमितने सुवर्ण पंच मारत पुन्हा एकदा आपल्यातील क्षमता सिद्ध करुन दाखवली आहे.  

पुरुष गटातील ४९ किलो वजनी गटातील अंतिम फेरीत दीपक सिंगला पराभवाला सामोरे जावे लागले. कझाकस्तानच्या टेमिर्टास झुस्सुपोव्ह याने दुखापतीच्या कारणास्तव माघार घेतल्यानंतर दीपकला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला होता. मात्र, उझबेकिस्तानच्या नोदीरजोन मिर्जाहमेदोवच्या आक्रमक खेळापुढे त्याला फारसा प्रभावी खेळ दाखवण्यात अपयश आले. त्यामुळे दिपकला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले आहे.