पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आशिया इलेव्हन संघाची घोषणा, भारताचा षटकार तर पाकचा भोपळा!

आशियाई इलेव्हन संघाची घोषणा

पुढील महिन्यात वर्ल्ड इलेव्हन आणि आशिया इलेव्हन संघात दोन सामन्यांची टी-२० मालिका नियोजित आहे. बांगलादेशमधील ढाकाच्या 'शेर-ए- बांगला' स्टेडियमवर होणाऱ्या या मालिकेसाठी आशिया इलेव्हनची घोषणा करण्यात आली. बांगलादेशचे संस्थापक शेख मजीबर रहमान यांच्या शंभराव्या स्मृतीदिनार्थ ही मालिका आयोजित करण्यात आली आहे. १८ मार्च आणि २१ मार्च रोजी वर्ल्ड इलेव्हन आणि आशिया इलेव्हन यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे.  
विराट म्हणतो, लाजिरवाणा पराभव डोक्यात ठेवणार नाही!

बांगलादेश क्रिकेट मंडळाने या मालिकेसाठी १५ सदस्यी संघ निवडला आहे. या संघात कर्णधार विराट कोहली, केएल राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादल या सहा भारतीयांचा समावेश आहे. राहुल आणि विराटला प्रत्येकी एक-एक सामना खेळणे अपेक्षित आहे. १८ मार्च रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना नियोजित आहे. त्यामुळे या सामन्यात विराट कोहली खेळण्याची शक्यता कमी आहे. अखेरच्या सामन्यात तो खेळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी खेळाडूंच्या उपलब्धतेनुसार एक यादी बांगलादेश क्रिकेट बोर्डाला दिली होती. यावरुनच अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. वर्ल्ड इलेव्हन विरुद्धच्या सामन्यात एकाही पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश नाही. पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा सुरु असल्यामुळे ते या मालिकेपासून दूर राहिल्याचे वृत्त आहे. आशिया इलेव्हनमध्ये भारत, बांगलादेश, श्रीलंका, नेपाल आणि अफगानिस्तानच्या क्रिकेटपटूंचा समावेश आहे.  

दीप्ती-वेदाचा हा फोटो शेअर केल्यानं भारतीय चाहते ICC वर भडकले

आशिया इलेव्हन: केएल राहुल (एक सामना), शिखर धवन, तमीम इक्बाल, विराट कोहली (एक सामन्यासाठी), लिटन दास, ऋषभ पंत, मुशफिकुर रहीम, थिसारा परेरा, राशिद खान, मुस्तफिजुर रहमान, संदीप लामिछाने, लसिथ मलिंगा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, मुजीब उर रहमान.

वर्ल्ड इलेव्हन : एलेक्स हेल्स, क्रिस गेल, फाफ डु प्लेसी (कप्तान), निकोलस पूरन, रोस टेलर, जॉनी बेयरेस्टो, कीरन पोलार्ड, आदिल राशिद, शेल्डन कोट्रेल, लुंगी एनगिडी, एंड्रयू टाय, मिशेल मॅक्लिनेगन.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:asia xi vs world xi BCB announce the Asia XI to face a World XI in a T20 series virat kohli kl rahul rishabh pant mohammed shami kuldeep yadav shikhar dhawan