पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बीसीसीआय 'राजी' नसल्यामुळे पाक क्रिकेट बोर्डाला मोठा दणका बसणार

पाकिस्तान क्रिकेट संघ (संग्रहित छायाचित्र)

भारतीय क्रिकेट मंडळामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का बसण्याचे संकेत आहेत. यंदाच्या वर्षी आशियाई चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले होते. पण बीसीसीआयने पाकिस्तामध्ये क्रिकेट न खेळण्याच्या निर्णयावर ठाम असल्यामुळे ही स्पर्धा बांगलादेश किंवा श्रीलंकेत खेळवण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.   

BCCI च्या करारातून धोनी आउट! कोहली, रोहित अन् बुमराह A+ श्रेणीत

सप्टेंबर २०२० मध्ये टी-२० आशिया स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार नसल्याचे जवळ जवळ स्पष्ट झाले आहे. ही स्पर्धा बांगलादेश किंवा श्रीलंकेत खेळवण्याबाबत विचार सुरु आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यास तयार नसल्यामुळे हा निर्णय घेतल्याचीही चर्चा सुरु आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी ही स्पर्धा नियोजित आहे. पाकिस्तान आणि आशियाई क्रिकेट मंडळाने स्पर्धेसाठी पर्यायी ठिकाणाबाबत विचार विनिमय करण्यास सुरुवातही केली आहे. मागील वर्षी आशियाई चषक ५० षटकांचा खेळवण्यात आला होता. ही स्पर्धा दुबईमध्ये खेळवण्यात आली होती. मात्र यावेळी बांगलादेश किंवा श्रीलंका यांना स्पर्धेचे यजमानपद मिळू शकते. 

पृथ्वीचं दुखापत ग्रहण सुटले! न्यूझीलंड दौऱ्यावर 'शो' दाखवण्यास शॉ सज्ज

२००८ मध्ये पाकिस्तामध्ये शेवटची आशियाई चषक स्पर्धा खेळण्यात आली होती. त्यावेळी श्रीलंका आणि भारत यांच्यात अंतिम सामना रंगला होता. श्रीलंकने १०० धावांनी हा सामना जिंकला होता. २००९ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या क्रिकेटला ग्रहण लागले होते. श्रीलंकनेच मागील वर्षाच्या अखेरीस पुन्हा पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याचा धाडसी निर्णय घेत पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा बंद झालेला दरवाजा उघडला. मात्र भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास तयार नसल्यामुळे पाकिस्तानचे यजमानपद धोक्यात आले असून त्यांना आशियाई स्पर्धेच्या यजमानपदाला मुकावे लागणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:asia cup 2020 will not held in pakistan this tournament will host by bangladesh or sri lanka