पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आशियाई बॅडमिंटन स्पर्धा: 'नो बॅकअप' सिंधू, सायनासह समीरचेही 'पॅकअप'

पी.व्ही.सिंधू

आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या स्टार बॅडमिंटनपटूंना पराभवाचा धक्का बसला आहे. भारताला ज्या सिंधू आणि सायनाकडून पदकाची आशा होती त्यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. रिओ ऑलिम्पिक विजेत्या सिंधूला चीनची प्रतिस्पर्धी भारी पडली. काई यानयानने सिंधूला २१-१९, २१-९ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. 

महिला गटातील दुसऱ्या सामन्यात तीन सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात जपानच्या यामागुचीने सायनाला २१-१३, २१-२३, २१ असे पराभूत करत सायनाविरुद्ध असणारे आपले वर्चस्व कायम राखले. यामागुचीविरुद्ध आतापर्यंत खेळलेल्या दहा सामन्यात सायनाला केवळ दोन सामने जिंकता आले आहेत. सायनाला तिने आज आठव्यांदा पराभूत केले. 

पुरुष एकेरीमध्ये किदाम्बी श्रीकांत पहिल्याच फेरीत गारद झाल्यानंतर समीर वर्माने आशा पल्लवीत केल्या होत्या. पण त्यालाही उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीनच्या शी युकीने त्याला २१-१०, २१-१२ अशा फरकाने अवघ्या ३६ मिनिटात गुंडाळले.