पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शेन वॉर्नने सांगितले, स्मिथ आणि विराटमध्ये कोण आहे सरस ?

स्टिव्ह स्मिथ आणि विराट कोहली

चार डाव, एका द्विशतकासह एकूण तीन शतके आणि एक अर्धशतकाच्या जोरावर स्टिव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये जबरदस्त पुनरागमन केले आहे. अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाचा हा माजी कर्णधार प्रचंड फॉर्मात आहे. गुरुवारी त्याने द्विशतक ठोकले. त्याने भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत कसोटी क्रिकेटमधील अव्वल फलंदाजाचे स्थान १३ महिन्यानंतर पुन्हा पटकावले आहे. परंतु, सध्या क्रिकेट जगतात विराट आणि स्मिथमध्ये कोणता फलंदाज सरस आहे, यावरुन वाद सुरु आहे. 

ASHES 2019: स्टिव्ह स्मिथचे २६ वे शतक, अनेक विक्रमांची केली नोंद

ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्नने कसोटी क्रिकेटसाठी स्मिथ हा कोहलीपेक्षा जरासा पुढे असल्याचे म्हटले आहे. पण क्रिकेटच्या सर्व प्रकारात कोहली सरस असल्याचे त्याने म्हटले आहे. कोहली सचिन तेंडुलकरच्या १०० आंतरराष्ट्रीय शतकाचा विक्रम मोडेल असी आशा त्याला आहे. 

वॉर्नने म्हटले की, कसोटी क्रिकेटबाबत बोलायचे म्हटले तर कदाचित कोहली आणि स्मिथपैकी एकाला निवडणे कठीण होईल. पण मला वाटते की, जर कसोटी क्रिकेटमध्ये एका फलंदाजाला निवडायचे असेल तर स्मिथला मी पसंती देईन. जर मी असे करु शकलो नाही तर माझ्याकडे विराट असेल. मला याचाही आनंद होईन, कारण तो एक महान खेळाडू आहे. 

विराटने शेअर केला फोटो, ट्रोर्ल्सनी म्हटले चलन कापल्यानंतर झाले हे हाल

माझ्या दृष्टीने विराट जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. जर मला सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून एका फलंदाजाची निवड करायची असेल तर मी विराटला निवडेन. मी ज्या फलंदाजांना वनडे सामन्यात किंवा सर्वंच प्रकारात पाहिले. त्यात व्हिवियन रिचर्ड्स हा सर्वांत महान फलंदाज होता. पण आता विराट कोहली माझ्या नजरेत महान वनडे फलंदाज आहे. तो व्हिवच्याही पुढे गेला आहे.

विराट कोहलीच्या नावे ६८ आंतरराष्ट्रीय शतकांच्या नावांचा समावेश आहे. ३० वर्षीय विराट सचिन तेंडुलकरच्या १०० शतकांचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.

T-20 :विराट-रोहितअगोदर २००० धावांचा टप्पा गाठणाऱ्या मितालीची निवृत्ती

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ashes series 2019 Australian Steve Smith Best in Tests and virat kohli on top across formats says shane warne