विश्वविजेता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेला गुरुवार पासून सुरुवात होत आहे. पारंपारिक कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात विश्वविजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केलेल्या गोलंदाजाला स्थान देण्यात आलेले नाही.
इंग्लंडच्या ताफ्यात जोफ्रा आर्चरला अकरामध्ये स्थान मिळालेले नाही. या युवा गालंदाजाने विश्वचषकातील कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित करुन सोडले होते. विश्वचषकातील त्याची कामगिरी पाहता त्याला संघात स्थान मिळेल, अशी आशा होती मात्र अंतिम अकरा खेळाडूत त्याला स्थान मिळालेले नाही. त्याच्यासह सॅम कुरेन आणि ऑली स्टोन यांनाही बाहेर बसावे लागणार आहे.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ :
रॉरी बर्न्स, जेसन रॉ., जो रुट (कर्णधार), जो डेन्ली, जोस बटलर, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्ट्रो, मोईन अली, क्रिस वोक्स, स्टुअर्ड ब्रॉड, जेम्स अँड्रसन
अॅशेस मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी - १ ते ५ ऑगस्ट, एडबॅस्टन, बर्मिंगहॅम
दुसरी कसोटी - १४ ते १८ ऑगस्ट, लॉर्ड्स, लंडन
तिसरी कसोटी - २२ ते २६ ऑगस्ट, हेडिंग्ली, लीड्स
चौथी कसोटी - ४ ते ८ सप्टेंबर, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी - १२ ते १६ सप्टेंबर, ओव्हल, लंडन