पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ASHES 2019 1st Test : लायनसमोर इंग्लंड 'घायल', ऑस्ट्रेलिया विजयी

लायनने सर्वाधिक ६ बळी टिपले

ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात विजयी सलामी दिली. एजबेस्टनच्या मैदानात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला  २५१ धावांनी पराभूत केले. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आघाडी कोलमडल्यानंतर स्मिथने शतकी खेळीनं ऑस्ट्रेलियाला तारले. त्याच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २८४ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडने पहिल्या डावात ३७४ धावा करत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९० धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने ७ बाद ४८७ धावा करत डाव घोषित करत इंग्लंडला ३९८ धावांचे लक्ष्य दिले होते. 

विराट भारी की स्मिथ? सोशल मीडियावर रंगली चर्चा

या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या यजमानांनाना मैदानात तग धरता आला नाही. नॅथन लायनच्या फिरकीसमोर कांगारू हतबल ठरले. त्याने ६ गड्यांना तंबूत धाडले. तर त्याला पॅटन कमिन्सने ४ गडी बाद करत उत्तम साथ दिली. या दोन गोलंदाजांनी इंग्लंडचा डाव १४६ धावांत आटोपला.   

Ashes 2019 : स्टम्पला चेंडू लागूनही जो रुट नाबाद!

१९८१ नंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच पहिल्या डावात पिछाडीवर असूनही सामना खिशात घातला. यापूर्वी १९८१ मध्ये ट्रेंडब्रिजच्या मैदानात ६ धावांवर पिछाडीवर असूनही सामना जिंकण्याचा पराक्रम केला होता. एजबेस्टनच्या मैदानात पहिल्या डावात पिछाडीवर असणाऱ्या संघाने सामना जिंकण्याची ही पहिली वेळ आहे.