पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Ashes 2019 : जो रुटच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

जो रुट

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ६७ धावांत खुर्दा पाडला. पहिल्या डावात इंग्लंडचा सलामीवीर डेन्ली व्यतिरिक्त अन्य कोणत्याही फंलदाजाला दोन आकडी धावसंख्या उभारता आली नाही. इंग्लंडचा कर्णधार जो रुटला हेजलवूडने खातेही उघडू दिले नाही.

Ashes 2019 : इंग्लंडचा संघ अवघ्या ६७ धावांत गारद

जेसन रॉयची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेला रुट दुसऱ्या चेंडूवर वॉर्नरकडे झेल देवून तंबूत परतला. कसोटी क्रिकेटमध्ये हेजलवूडने रुटला सहाव्यांदा तंबूत धाडले. अ‍ॅशेस कसोटी मालिकेत शून्यावर बाद होणारा जो रुट इंग्लंडचा चौथा कर्णधार ठरला. यापूर्वी १९७७ मध्ये माईक बेअरली १९५३ मध्ये लिओनार्ड हटन आणि १९३८ मध्ये वॉल्टर हेमॉन्ड या इंग्लंड कर्णधारांवर अ‍ॅशेस मालिकेत शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावली होती.

अश्विनऐवजी जडेजाला खेळवण्याबाबत रहाणेनं दिलं स्पष्टीकरण  

 हेजलवूडनंतर ऑस्ट्रेलियन लायन आणि मिचेल स्टार्क यांनी जो रुटला तब्बल पाचवेळा बाद केले आहे. भारताचा रविंद्र जडेजा तसेच न्यूझीलंडचा बोल्ड आणि साउथी यांनी देखील रुटला कसोटी सामन्यात पाचवेळा तंबूत धाडले आहे.