पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अ‍ॅशेस २०१९ : आता कसोटीतही दिसणार रंगबेरंगी जर्सीतील 'ती' झलक

जो रुट

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेमध्ये पहिल्यांदाच क्रिकेटर्स नाव आणि क्रमांक असणारी जर्सी घालून मैदानात उतरणार आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, या मालिकेदरम्यान खेळाडू नाव आणि क्रमांक असलेल्या जर्सीचा वापर करणार आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन काही फोटोही शेअर केले आहेत.  

वनडे आणि टी-२० सामन्यात यापूर्वीपासूनच नाव आणि क्रमांक असलेल्या जर्सीसह खेळाडू मैदानात उतरल्याचे आपण पाहिले आहे. मात्र त्यानंतर आता कसोटीला एक नवं रुप देण्यासाठी पांढऱ्या जर्सीवर रंगबेरंगी जर्सीतील झलक पाहायला मिळणार आहे. 

युवीनं लाराला सांगितला गांगुलीच्या 'दादागिरी'चा किस्सा

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जो रुटचा एक फोटो शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या फोटोमध्ये जो रुटच्या जर्सीवर त्याचे नाव आणि ६६ क्रमांक असल्याचे दिसते. यामुळे इंग्लंड नव्या तोऱ्यात मैदानात उतरणार हे स्पष्ट झाले असले तरी ऑस्ट्रेलियन टीममधील खेळाडूही याच रुपात दिसणार का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.  

Ashes 2019 : क्रिकेटमध्ये नव्या नियमाची भर पडण्याचे संकेत

या मालिकेकडे कसोटी क्रिकेटमधील बदलाचे स्वरुप पाहायला मिळणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. याबाबत काही क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी देखील व्यक्त केली होती. १ ऑगस्टपासून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बर्मिंगहॅमच्या मैदानातून सुरुवात होणार आहे.