पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वर्षभराच्या बंदीनंतरही स्मिथ कॅलेंडर इयरमधील टॉपर!

स्टीव्ह स्मिथ

अ‍ॅशेस मालिकेत दमदार कामगिरीनं ऑस्ट्रेलियन संघाला भक्कम स्थितीत नेऊन ठेवणाऱ्या स्टीव्ह स्मिथच्या कामगिरीचे आयसीसीने कौतुक केले आहे. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात स्मिथने ३१९ चेंडूत २११ धावांची दमदार खेळी केली. यात त्याने २४ चौकार आणि दोन षटकार खेचले. या खेळीने त्याने अनेक विक्रम मोडीत काढले.  

आयसीसीने त्याच्या कामगिरीचे कौतुक करताना स्मिथला अव्वल ठरवणारी आकडेवारी देखील शेअर केली आहे. चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणात एक वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून ऑगस्टमध्ये स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. अर्धे वर्ष सरल्यानंतर पुनरागमन करुनही या कँलेंडर वर्षात स्मिथच्या नावे सर्वाधिक धावांची नोंद आहे.  
इंग्लंडविरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत स्मिथने १४४ आणि १४२ धावांची खेळी केली होती. बंदीनंतर ही त्याचा पहिला कसोटी सामना होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात जोफ्रा आर्चरचा उसळता चेंडू लागल्यानंतर झालेल्या दुखापतीनंतर स्मिथ तिसऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकला होता. त्यानंतर चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात त्याने दमदार द्विशतक साजरे केले.  

शेन वॉर्नने सांगितले, स्मिथ आणि विराटमध्ये कोण आहे सरस ?

२०१९ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ५८९ धावांसह स्मिथ अव्वलस्थानी आहे. इंग्लंडचा बेन स्टोक्स (५१३), ऑस्ट्रेलियन ट्रॅविस हेड (५०३), दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डिकॉक (४२८) आणि श्रीलंकन दिमुथ करुणारत्ने (४२७) धावा केल्या आहेत. पहिल्या पाचमध्ये एकाही भारतीय फंलदाजाचा समावेश नाही.