पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जोफ्राला खिलाडूवृत्ती शिकवणाऱ्या अख्तरची युवीनं घेतली शाळा

युवराज सिंग आणि शोएब अख्तर

अ‍ॅशेस मालिकेतील लॉर्डसच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात  इंग्लंडचा युवा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरचा एक उसळता चेंडू स्टीव्ह स्मिथच्या मानेवर लागला. ताशी १५० किमी वेगाने असणारा चेंडू लागल्याने स्मिथ मैदानात कोसळल्याचेही पाहायला मिळाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने जोफ्रावर निशाणा साधला होता. 

अ‍ॅशेसः कसोटीत पहिल्यांदाच १२ व्या खेळाडूने केली फलंदाजी

क्रिकेटच्या मैदानात उसळता चेंडू काहीवेळा अनावधानाने फलंदाजाला इजा पोहचवतो. या परिस्थितीत गोलंदाजाने फलंदाजाची विचारपूस करणे आवश्यक असते. स्मिथ वेदना झेलत असताना जोफ्राने त्याची विचारपूस करायला हवी होती. पण जोफ्राने तसे काहीच केले नाही. माझ्याकडून अशी घटना घडली तर मी आवर्जून फलंदाजाची विचारपूस करायचो, अशा आशयाचे ट्विट करत अख्तरने जोफ्रामध्ये खिलाडूवृत्तीचा अभाव असल्याचे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. 

VIDEO: आर्चरचा १५० किमी वेगाने येणाऱ्या चेंडूने घेतला स्मिथच्या डोक्याचा वेध

मात्र, त्याच्या या ट्विटवर भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने अख्तरची शाळा घेतली आहे. युवराज सिंगने ट्विटच्या माध्यमातून अख्तरचे मैदानातील खऱ्या वर्तनाबाबत भाष्य केले आहे. ट्विटमध्ये युवराजने लिहलंय की, तू फलंदाजापर्यंत जात होतास. पण यावेळी तू फलंदाजाची विचारपूस करण्याऐवजी त्याला अशा प्रकारच्या आणखी चेंडूचा मारा सहन करायला तयार रहाण्यास सांगत होतास, अशा शब्दांत युवीने अख्तरला फटकारले आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ashes 2019 england vs australia shoaib akhtar got trolled by yuvraj singh here is why jofra archer steve smith