पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Ashes 2019 : स्टोक्सची अविश्वसनीय खेळी, इंग्लंडने मैदान मारलं

बेन स्टोक्स

अष्टपैलू बेन स्टोक्सच्या झुंजार नाबाद शतकाच्या जोरावर इंग्लंडने अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात रोमहर्षक विजयाची नोद केली. बेन स्टोक्सने जीगरबाज खेळ करत २१९ चेंडूत नाबाद १३५ धावांची अविश्वसनीय खेळी केली. या विजयासह इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.  इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३५९ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांच्या फ्लोपशो पाहायला मिळाला. त्यानंतर कर्णधार जो रुट (७७) आणि जो डेन्ली (५०) यांनी संघाचा डाव सावरला.

Video : हेझलवूडच्या बाउन्सरने स्टोक्सच्या हेल्मेटचे तुकडे

ही जोडी तंबूत परतल्यानंतर अष्टपैलू बेन स्टोक्सने खेळाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. एकाबाजूने पडझड सुरु होती. जॉनी बेअरस्टोर ३६ आणि जोफ्रा आर्चर १५ धावांची भर घालून परतल्यानंतर सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला होता. ९ बाद २८६ धावा असताना लीच मैदानात उतरला. त्याला हलके फुलके स्टाइक देत बेन स्टोक्सने स्वत: ऑस्ट्रेलियाच्या माऱ्याचा सामना करणे पसंत केले. दुसऱ्या बाजूला लीचने १७ चेंडूत १ धावा करत स्टोक्सला उत्तम साथ दिली. क्रिकेटच्या मैदानातील अप्रतिम कसोटी  सामना असे वर्णन या सामन्याचे करता येईल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ashes 2019 England vs Australia 3rd Test Live Cricket Score Commentary Ben Stokes ben stokes classic century