पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Ashes 2019 : स्टम्पला चेंडू लागूनही जो रुट नाबाद!

जो रुट

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील इंग्लंडच्या पहिल्या डावात कर्णधार जो रुटला नशिबाची साथ मिळाल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवशीच्या डावात जेम्स पॅटसनने अप्रतिम चेंडूनं  स्टम्पचा वेध घेतला. पण बेल्स जागेवर स्थिर राहिल्याने जो रुटला जीवदान मिळाले.  डावातील २१ व्या षटकात जो रुटला पंचांनी बाद ठरवले होते. यावेळी इंग्लंडच्या धावफलकावर १ बाद ५३ धावा लागल्या होत्या. जो रुटने तात्काळ रिव्ह्यू घेत आपली विकेट वाचवली होती. 

Ashes 2019: पहिल्याच दिवशी पंचांनी दिले ७ चुकीचे निर्णय

उपहारानंतर जो रुट अर्धशतकी खेळी करुन बाद झाला. त्याने ११९ चेंडूत ६ चौकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत ५७ धावांची भर घातली. सिडलने स्वत:च्या गोलंदाजीवर त्याचा सुरेख झेल टिपला. उल्लेखनिय आहे की, अ‍ॅशेस मालिकेदरम्यान पारंपारिक लाकडी बेल्सचा वापर करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय सामन्यात एलईडी स्टम्प आणि बेल्सच्या प्रयोग करण्यात येतो.

अ‍ॅशेस मालिका : इंग्लिश चाहत्यांनी केलं डेव्हिड वॉर्नरला लक्ष्य

इंग्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान एलईडी स्टम्प आणि बेल्सचा मुद्दा वादग्रस्त ठरला होता. काही सामन्यात स्टम्पला चेंडू लागून सुद्धा बेल्स न पडल्याने फलंदाजाला जीवदान मिळाल्याचे पाहायला मिळाले. एलईडी स्टम्प आणि बेल्स बेल्स लाकडी बेल्सपेक्षा अधिक वजनाच्या नसतात असा दावा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने दावा केला होता.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ashes 2019 england vs australia 1st test luck saves joe root against james pattinson watch video