पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Ashes 2019: पहिल्याच दिवशी पंचांनी दिले ७ चुकीचे निर्णय

Ashes 2019: पहिल्याच दिवशी पंचांनी दिले ७ चुकीचे निर्णय

Ashes 2019, England vs Australia, 1st Test Day 1: आयसीसी विश्वचषक २०१९ नंतर पंचांच्या सदोष निर्णयांमुळे अनेक प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंचाच्या कामगिरीचा घसरत चाललेला दर्जा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. विश्वचषक २०१९ च्या अंतिम सामन्यातही यावरुन मोठा वाद झाला. आत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या अ‍ॅशेज २०१९ च्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा खराब पंचगिरी पाहण्यास मिळाली.

Ashes 2019: अ‍ॅशेजच्या पहिल्या दिवशी शतक केल्यानंतर स्मिथ भावुक

सर्वांत अनुभवी पंच कुमार धर्मसेना यांनी विश्वचषकातील अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरोधात ६ धावांचा निर्णय चुकीचा असल्याचे मान्य केले होते. त्या अतिरिक्त धावांमुळे सामना अनिर्णीत राहिला आणि सुपर ओव्हरमध्ये जास्त चौकार लगावल्यामुळे इंग्लंड विश्वविजेता ठरला होता. तो वाद अजून थंडावलेला नाही. दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरोधात एजबस्टनमध्ये अ‍ॅशेजच्या पहिल्या कसोटीतही दोन्ही संघांना अनेकवेळा डिसिजन रिव्ह्यूवरच (डीआरएस) अवलंबून राहावे लागले. 

सामन्याच्या पहिल्याच दिवशी पंचांनी ७ चुकीचे निर्णय दिले. ज्यामध्ये ५ निर्णय डीआरएसमध्ये बदलण्यात आले. काही निर्णय दुर्भाग्यशाली राहिले. पहिल्या कसोटीत मैदानावर पंच जोएल विल्सन आणि अलीम दार हे उभे आहेत. ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न आणि इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेन यांनी खराब पंचगिरीवरुन टीका केली आहे. 

धवनच्या पोस्टमुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अधिकारी अडचणीत

डेव्हिड वॉर्नर आणि जेम्स पॅटिसनला पंचांनी बाद दिले. पण बाद नसतानाही त्यांनी रिव्ह्यू घेतला नाही. वॉर्नर दुसऱ्याच षटकांत बाद झाला असता. पण पंचांना चेंडू वॉर्नरच्या बॅटची कड घेऊन गेल्याचे समजलेच नाही.

इंग्लंडने याप्रकरणी रिव्ह्यूही घेतला नाही. पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा उस्मान ख्वाजा, स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, जेम्स पॅटिसन आणि पीटर सीडल यांना फटका बसला. ख्वाजाला पंचांनी नाबाद ठरवले. इंग्लंडने रिव्ह्यू घेतला. त्यात चेंडूने बॅटची कड घेतली होती.

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया 'अ‍ॅशेस' कसोटीच्या नावामागे दडलाय खास इतिहास

मॅथ्यू वेडने संघात पुनरागमन केले आहे. यष्ट्यांसमोर पॅडवर चेंडू आदळूनही त्याला नाबाद ठरवण्यात आले. इंग्लंडने आणखी एक रिव्ह्यू घेतला. त्यावेळी वेड पुन्हा तंबूत परतला. त्यानंतर खराब पंचगिरीचा फटका स्टिव्ह स्मिथलाही बसला. स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर त्याला बाद देण्यात आले. स्मिथने रिव्ह्यू घेतला. त्यात तो नाबाद राहिला. पीटर सीडललाही बाद देण्यात आले होते. पण रिव्ह्यू घेतल्यानंतरही तो नाबाद राहिला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ashes 2019 england vs australia 1st test day 1 Umpires trolled on Twitter as blunders 7 wrong decisions